Widgets Magazine
Widgets Magazine

स्पर्शा शिवाय ही प्रेम असतं?

love
हो, असतं...

तिची तासनतास वाट बघणं...प्रेम असतं
विषय नसताना रात्रभर गप्पा मारणं.. प्रेम असतं
Widgets Magazine
ड़ोळ्यांनी जाऊ नको आर्जव करणं...प्रेम असतं
शेजारी येऊन बस खुणावणं... प्रेम असतं

इतर कुणाशी बोलताना जेवढ्यास तेवढे ठेव.. सांगणं.....प्रेम असतं
घरी,ऑफिस पोहचल्यावर मॅसेजची वाट बघणं... प्रेम असतं

अर्ध पाणी प्यायला ग्लास.. तिने उचलणं..प्रेम असतं
चुकून स्पर्श झाला तर देहभर शहारणं... प्रेम असतं

तिने हाक मारली कि मोरपिस फिरणं..प्रेम असतं
सगळ्या सोबत असूनही ती हवीशी वाटणं... प्रेम असतं
सगळे फोटो , सगळ्या पोस्ट.. लाईक करणं...प्रेम असतं
इतर कुणी केलेल्या खास कमेंट्स वर चिड़णं... प्रेम असतं

बरं नसेल कधी तर शब्दातून सोबत करणं..प्रेम असतं
मांडीवर ड़ोक ठेवं बरं वाटेल ...आधार देणं... प्रेम असतं

चुक तिची असताना
Sorry म्हणणं ... प्रेम असतं
लांबून तिला बघताना लाजणं. .ओठांवर हसू येणं...प्रेम असतं

आवाज तिचा ऐकून
मोहरणं... प्रेम असतं
फोनवर बोलताना तिच्याशी..एकांत शोधणं..प्रेम असतं
तिने आवडता ड्रेस घातल्यावर खात्री पटणं..प्रेम असतं
आपण दिलेला गजरा माळल्यावर .. कळी खूलणं. ..प्रेम असतं

तिच्यासाठी हळवं होणं...प्रेम असतं
तिच्या सुखासाठी माघार घेणं ही.... प्रेमच असतं...
प्रेमच असतं हो ना ???

Widgets Magazine

यावर अधिक वाचा :