रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: मंगळवार, 22 डिसेंबर 2020 (11:57 IST)

कोरोणावरील लसीसाठी टोल फ्री क्रमांक फिरवा

कोरोणावरील लसीची वितरण व्यवस्था जर ..मोबाइल कंपन्यांच्या कॉल सेंटर कडून केल्यास होणारे संभाषण असे असेल ..

त्याने टोल फ्री क्रमांक फिरवला 
तो : हॅलो,
पलीकडून : मराठी साठी एक दाबा....इंग्लिश साठी दोन दाबा....तो एक दाबतो.
पलीकडून : रशियन लसी साठी 1 दाबा...अमेरिकन लसी साठी 2 दाबा... भारतीय लसी साठी 7 दाबा...तो 7 दाबतो.
पलीकडून : स्त्री असाल तर एक दाबा... पुरुष असाल दोन दाबा.....तो पुन्हा 2 दाबतो.
पलीकडून : लस विकत हवी असेल तर 1 दाबा...फुकट हवी असेल तर 7 दाबा...तो 7 दाबतो.
पलीकडून : लस दंडावर घेण्यासाठी 1 दाबा...कमरेवर घेण्यासाठी 2 दाबा...अन्य ठिकाणी घेण्यासाठी...7 दाबा ...तो 2 दाबतो
पलीकडून : कृपया तुमचा मोबाईल no टाईप करा..व स्टार दाबा... 
तो- मोबाईल नंबर * सेंड करतो.
पलीकडून : धन्यवाद....तुमचे मोफत लशीसाठी चे नाव नोंद केले गेले आहे..तुमचा no आहे..70 कोटी 90 लाख 80 हजार 555 वा......साधारण 3 वर्ष लागतील तुमचा नंबर यायला...तो पर्यंत जिवंत रहा...काळजी घ्या...घरीच थांबा... सतत हाथ धुवत बसा...मास्क वापरा... फोन केल्या बद्दल धन्यवाद आपला दिवस शुभ जावो...