testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

पुण्याचा पाऊस बायकांसारखा

rain
मुंबईचा पाऊस मर्दासारखा असतो.
...पुरुष रागावला कि भडभडा बोलतो. मग मन साफ.. पाऊस पण रपरपा पडतो. सारे साफ होते.

पुण्याचा पाऊस बायकांसारखा
...त्या चिडल्या कि धड स्पष्ट बोलत नाहीत. नुसती दिवसभर पिरपिर चालु. पाऊस पण धड रपरपा पडत नाही. दिवसभर पिरपिर रिप रिप भुरभुर चालु असते. नुसता वैताग!

सोलापुरचा पाऊस
एका प्रेयसीसारखा
...सारखी वाट पहायला लावणार....
वेळ कधीच नाही पाळणार.....
आला तर प्रेयसीसारखा
झुळूक दाखऊन भरकन जाणार

अन् पुन्हा वाट पहायला लावणार....

कोकणचा पाऊस
...लग्न झाल्यावर संसारात गुंतून जातो तसा
एकदा सुरवात झाली की शेवट पर्यंत धो धो धो धो धो धो
पडतो ...


यावर अधिक वाचा :