1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: बुधवार, 11 जून 2025 (17:03 IST)

पण सासू तेवढी बदलून दे....

saas bahu jokes in marathi
"कशी आहेस?"
 
"मी छान. तू कशी आहेस?"
 
"मी पण छानचय."
 
"काय खास?"
 
"कांSSSही खास नै
अन् विशेष पण नै बै"
 
"काय केलंस वटसावित्री दिवशी?"
 
"काय करणार गं वेगळं? हेच की..
 न्हाणी धुणी,
अन्
स्वयंपाक पाणी..
तूझं?"
 
"आमच्याकडं वडाची पूजा झाल्याशिवाय सासूबाई पाणी पण प्यायला देत नाहीत."
 
"असं...?"
 
"शिवाय सोवळ्यानं स्वयंपाक."
 
"अवघडंचै बै"
 
"पण ऐक ना. मला सासऱ्यांनी तोळाभर सोनं दिलंय. अन् तूला हवा तो दागिना घे म्हणालेत करून....!"
 
"अग्गोबाईSSS.... 
काय सांगतेस काSSSSSय
पण का म्हणे?"
 
"असंच"
 
"असंच म्हणजे?"
 
"अगं मी वडाला प्रार्थना केली ना... 
ती त्यांनी ऐकली आणि 
ती त्यांना खूप आवडली."
 
"काय प्रार्थना केली होतीस तू अशी?"
 
"हेच, की सात जन्म हाच नवरा मिळू दे... पण"
 
"पण काय?"
 
"पण सासू तेवढी बदलून दे....!!!"