काही मजेशीर म्हणी
वंशाला हवा दिवा, ती म्हणते ईश्श तिकडे जावा !
राहायला नाही घर म्हणे लग्न कर !
काटकसर करुन जमवलं, इंकम टॅक्समध्ये गमावलं...!
सासु क्लबमध्ये सुन पबमध्ये !
चुकल्या मुली ब्युटीपार्लरमध्ये !
खिशात नाही डोनेशन, घ्यायला चालला ऍडमिशन !
मुलं करतात चॅनेल सर्फ़, आईबाप करतात होमवर्क !
ज्या गावचे बार, त्याच गावचे हवालदार !
नाजुक मानेला मोबाईलचा आधार !
मनोरंजन नको रिंगटोन आवर !
जागा लहान फ़र्निचर महान !
उचलला मोबाईल लावला कानाला !
रिकाम्या पेपरला जाहिरातिंचा आधार !