testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

बॅकसीट


बॅकसीट... प्रत्येक गाडीला असतेच... त्यात काय विशेष ?

आता जरा लक्ष द्या...

आपल्या गाडीची बॅकसीट नजरेसमोर आणा...
आठवा बरं कोण-कोण बसतं तुमच्या बॅकसीटवर...
ताई, दादा, आई, बाबा, मित्र-मैत्रिणी, इ.

तुम्ही एक स्टेटस वाचलं असेल...
With Mom - 20 km/hr...
With Friends - 80 km/hr
Alone 120+... झिंगाट

तुम्ही आईला बॅकसीटवर घेऊन कधीच कट मारत नाही जाणार...

तेच जर सोबत मित्र असतील तर फुल्ल मस्ती...
तेच जर कोणी खास असेल तर साधा खडासुद्धा लागू देत नाहीत

अन् एकटे असल्यावर तर वार्यावर स्वार...

बघा ड्राईव्हर तुम्हीच पण तुमची बॅकसीट ठरवते तुम्ही गाडी कशी चालवणार ते....


आहे की नाही गंमत...!

आयुष्यपण असेच असते...

बघा हं...

तुमची गाडी म्हणजे तुमचं आयुष्य, तिचे ड्राईव्हर अर्थात तुम्ही स्वतः आणि तुमच्यावर जीव टाकणारी व तुमच्यावर अवलंबून असणारी माणसं हीच तुमची

बॅकसीट...यामध्ये तुमचे आई-बाबा, ताई-दादा, नवरा/बायको-मुलं असे सर्व...

तुम्ही एक जरी योग्य किंवा चूकीचा निर्णय घेतला तर त्याचा आनंद किंवा त्रास हा तुमच्या बॅकसीटला १००% होणार म्हणजे होणारच...

तुमची व्यसने, चुकीचे मित्र

तुमच्या
बॅकसीटला चार-चौघात मान खाली घालायला लावतात...

तेच जर तुम्ही एखादं चांगलं काम केलंत तर तुमच्या बॅकसीटच्या आनंदाला पारावार उरत नाही...

अहो अपघाताला ड्राईव्हरच जबाबदार असतो हो पण बॅकसीट वरचे मात्र फुकटच जखमी होतात... लक्षात येतय ना...?

आता तुमच्या आयुष्याच्या गाडीचं बॅकसीट पहा व एक छानसं Destination ठरवा... चांगले मित्र-मैत्रीण निवडा... मग बघा कसे अगदी सुखरुप पोहोचाल...

एकच विनंती - तुम्हाला तुमच्या आयुष्याच्या गाडीला टर्न द्यायचा असेल , यु-टर्न द्यायचा असेल किंवा अगदी स्टंटच करावा वाटत असेल तेव्हा किमान एकदा तरी आपल्या बॅकसीटचा विचार करुन मगच काय करायचं ते ठरवा...


यावर अधिक वाचा :

'मन हे वेडे....' अल्बम प्रदर्शनाच्या मार्गावर

national news
मानवी मनाच्या विविधस्पर्शी भावना आर्त स्वरात व्यक्त करणारा ‘मन हे वेडे….’ हा अल्बम ...

'शुभ लग्न सावधान' मधला सुबोध घाबरतो बायकोला !

national news
लग्न म्हणजे दोन जीवांचे मिलन असते. आयुष्यभर एकमेकांना एकत्र बांधून ठेवणारी ती अमुल्य गाठ ...

'धूम4'चा शाहरुख खलनायक

national news
प्रेक्षकांनी यशराज फिल्म्सनिर्मित 'धूम 4'च्या गेल्या तिन्ही भागांना भरभरून प्रतिसाद दिला. ...

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

national news
बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक सर्च केल जाणार्‍या ...

काळजात घंटी वाजवणारे 'पार्टी' सिनेमातील गाणे सादर

national news
सचिन दरेकर दिग्दर्शित, नवविधा प्रोडक्शनचे जितेंद्र चीवेलकर निर्मित आणि सुपरहिट फिल्म ...