बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: शुक्रवार, 27 एप्रिल 2018 (16:53 IST)

आणि फटके मारणारा राक्षस ??

एकदा एक व्यक्ति मेल्यानंतर नरकात पोहोचला. 
 
त्याने पाहिले की प्रत्येक व्यक्तीला कोणत्याही देशाच्या नरकात जाण्याची मुभा आहे.
 
 त्याने विचार केला ....
 
 चला अमेरिकन लोकांच्या नरकात  जावून पाहू,
 
जेव्हा तो तिथे पोहचला तेव्हा त्याने दरवाज्यावरील पहारेकऱ्याला विचारले:
 
काय भाऊ ,अमेरिकन नरकात काय काय चालतं ? 
 
 पहारेकारी म्हणाला : काही ख़ास नाही,
 
सर्वात आधी आपल्याला एका विद्युत् खुर्चीवर एक तास बसवून शॉक दिला  जाईल,
 
 मग आपल्याला एका खिळयांच्या खाटेवर  एक तास झोपवले जाईल,  त्यानंतर एक राक्षस येऊन आपल्या जख्मी पाठीवर पन्नास फटके मारेल ..... !
 
हे ऐकून तो व्यक्ति खुप घाबरला आणि रशियन नरकाकडे गेला, आणि तेथील पहारेकऱ्याला तेच विचारले .
 
 राशियन नरकाच्या  पहारेकऱ्याने सुद्धा तीच वाक्ये ऐकवीली जी अमेरिकन नरकाच्या पहारेकऱ्या कडून ऐकून आला होता.
 
 मग तो व्यक्ति एक एक करत सर्व  देशांच्या नरकाच्या दरवाज्यावर जावून आला,सर्व ठिकाणी त्याला भयानक किस्से ऐकायला मिळाले.
 
शेवटी जेव्हा तो एका ठिकाणी पोहचला,  
 
 तेथे पहातो तर दरवाज्यावर लिहिले होते  "भारतीय नरक"  
 
आणि त्या दरवाज्या बाहेर 
त्या नरकात जाण्यासाठी मोठी रांग लागली होती,लोक भारतीय नरकात जाण्यासाठी उतावीळ होत होते,  
 
त्याने विचार केला की येथे नक्की कमी शिक्षा मिळत असावी ...... ताबडतोब  त्याने पहारेकऱ्याला विचारले की शिक्षा काय आहे ?
 
पहारेकारी म्हणाला : काही विशेष नाही 
 
सर्वात आधी आपल्याला विद्युत् खुर्चीवर एक तास बसवले जाईल व इलेक्ट्रिक शॉक दिला जाईल.
 
मग एका खिळयांच्या खाटेवर एक तास झोपवले जाईल, 
 
त्यानंतर एक राक्षस येऊन आपल्या जख्मी पाठीवर पन्नास फटके घालेल ...! 
 
चक्रावून त्या व्यक्तिने त्याला विचारले :
 हे तर बाकीच्या देशांच्या नरकात पण होत आहे.मग इथेच गर्दी का??
 
पहारेकरी म्हणाला; विद्युत खुर्ची तिच आहे पण भारनियमन आहे विज नाही.
 
खिळ्यांच्या खाटेवरील खिळे कुणीतरी काढून नेले आहेत.
 
आणि फटके मारणारा राक्षस ??
 
तो जि.प.चा कर्मचारी आहे.
येतो सहि करतो चहा नाश्त्याला निघुन जातो.
 
आणि चुकून आलाचं तर एक दोन फटके मारतो.
अनं पंन्नास लीहीतो.