" ब्रम्हानंद "
आजोबा/आजी होण्याचा
आनंद!
▪नातवंडाच्या कृपेने अंगावरील कपडे
ओले झाल्याचा
वत्सल आनंद !
आणि
▪त्यांनी केलेले हट्ट पुरविण्याचा
गोड आनंद!
▪सूनेने, न मागता आणून दिलेल्या चहाचा
व औषध घेतले का..?
या प्रेमळ चौकशीचा
सात्त्विक आनंद!
▪वाढदिवसाला, मुलाने दिलेल्या शालीचा....
ऊबदार आनंद
▪आपण कुटुंबाला हवे आहोत......
या भावनेचा
सुप्त आनंद
▪दुपारी जेवणानंतर पेपर वाचता वाचता
लागलेली डुलकी ...
परमानंद. !
▪रात्रीची निरव शांतता..
आराम खुर्चीवर डोळे मिटून
पहुडलेल्या क्षणी..
आपली आवडती गझल..
रेडिओने गुणगुणावी...
स्वर्गीय आनंद!
▪एखादा लेख किंवा कविता
आपण पोस्ट करावी..
मित्रांनी त्याला भरभरुन
दाद द्यावी...
साहित्यानंद!
▪मन अशांत असतांना....
देवघरातल्या भजनामुळे
निर्माण होणारा..
कैवल्यानंद!
▪भेटलेल्या जुन्या सवंगड्यांच्या भेटीमुळे होणारा...
अपार आनंद
▪नकारात्मक विचार सोडून दिले की मिळणारा....
निर्भेळ "आनंद"!
आणि या सर्व आनंदाची बेरीज करून, ती मनाच्या कप्प्यात साठविली की, पडल्यापडल्या लागलेली शांत झोप म्हणजेच...
"ब्रह्मानंद" !!!