testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

मीच एकटी का सावळी...

bakuli
Last Modified सोमवार, 1 जुलै 2019 (11:37 IST)
रुसुन बसली एकदा
कृष्णवाटिकेत बकुळी
सगळी पुष्प लेवती मोहक रंग
मीच एकटी का सावळी
वाटिकेतील फुले पाने लता
कुजबुजती एकमेकांच्या कानात
नाजुक साजुक आपली कन्या
का बरे मुसमुसे एका कोपर्‍यात

गेल्या तिला समजवायला
मोगरा सोनटक्का सदाफुली
बकुळी म्हणे उदास होऊन
शुभ्रतेपुढे तुमच्या दिसे मी कोमेजलेली

गुलाबराजा आला लवाजमा घेऊन
म्हणे कसले हे वेड घेतले मनी
बकुळी प्रश्न विचारी मुसमुसुन
का मोहक पाकळ्या लेवु शकत नाही तनी

सरतेशेवटी आला पारिजातक
सडा पाडत बकुळीच्या गालावर
थांब तुला सांगतो गुपित
मग हास्य फुलेल भोळ्या चेहर्‍यावर

कृष्णाने माझी भेट दिली सत्यभामेला
सडा मात्र पडे रुक्मिणीच्या अंगणात
भोळ्या राधेला काय बरं देऊ
हा विचार अविरत चाले भगवंताच्या मनात
तितक्यात आलीस तु सामोरी
गंधाने दरवळली अवघी नगरी
शुभ्र नाजुक तुझी फुले पाहुन
भगवंत म्हणती हिच राधेला भेट खरी

अलगद तुला घेता हाती
स्पर्शाने तु मोहरलीस
भरभरुन सुगंध देऊन हरीला
सावळ्या रंगात मात्र भिजुन गेलीस

ऐकुन हे बोल प्राजक्ताचे
बकुळी देहभान विसरुन गेली
अलौकिक आनंदाने होऊन तृप्त
राधाकृष्णाच्या प्रेमरंगात रंगली


यावर अधिक वाचा :

नशीबवान' भाऊंच्या 'उनाड पाखराची झेप'

national news
भाऊ कदम यांच्या बहुप्रतीक्षित 'नशीबवान' चित्रपटाचं नवीन गाणं 'पाखरू' रिलीज झाले आहे. एक ...

बॉक्स ऑफिसवर कसा राहिला सिंबाचा पाचवा दिवस?

national news
बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंह आणि सारा अली खानची फिल्म सिंबा बॉक्स ऑफिसवर धमाल करत आहे. ...

सासुबाईंचे हे सुनबाईंना सांगणे

national news
सुनबाईस...... नको जाउ धास्तावून सासुरवासाच्या दडपणाने अग मीही गेलेय ...

श्रेया, सोनूच्या जादुई आवाजातील "बघता तुला मी" गाणं ...

national news
"प्रेमवारी" या चित्रपटाचे पाहिलं गाणं 'बघता तुला मी' गाणं प्रदर्शित झाले. एकमेकांना ...

म्हणून जान्हवी कपूर शिकत आहे 'उर्दू'!

national news
'धडक' सिनेमातून रुपेरी पडद्यावर दमदार आगमन केल्यानंतर अभिनेत्री जान्हवी कपूर आपल्या आगामी ...

जेव्हा मास्तरांची बायको विचारते कोण आहे ही हेमा?

national news
मास्तरांनी हेमा नावाने नंबर जतन केला. मास्तरांची बायको - "अहो तुम्हाला हेमाचा फोन येतो ...

अलिबागच्या उत्तरेला सागरी दुर्ग

national news
अलिबागच्या उत्तरेला पाच - सहा कि.मी. अंतरावर सागरकिनारी थळ हे लहानसे गाव आहे. हा परिसर ...

तयार व्हा, मार्व्हल स्टुडिओजकडून आगामी ११ चित्रपटांची घोषणा

national news
मार्व्हल स्टुडिओजच्या चौथ्या टप्प्यामध्ये थॉर ४, द फॅल्कन अँण्ड द विंटर सोल्जर आणि डॉक्टर ...

जलपरी सनी लिओनी, शेअर केले हॉट फोटो

national news
बॉलीवूड हॉट एक्ट्रेस सनी लिओनी आपल्या ग्लॅमरस आणि बोल्ड फोटोंसाठी नेहमी चर्चेत असते आणि ...

नयनरम्य पाचूचे बेट

national news
भारतातील सागरी संपत्ती, सागरी जीवनाचा वध घ्यायचं म्हटलं तर लक्षद्वीपला जायलाच हवे. ...