सोमवार, 1 सप्टेंबर 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: शनिवार, 8 फेब्रुवारी 2020 (12:13 IST)

हल्लीच्या बायकांचे मनातले श्लोक:-

whatsapp messages
जगी सर्व सूखी असा तोचि एक।
जयाच्या नशीबी मस्त-गाढ़ झोप॥
 
अनंता तुला मागणे हेचि आता।
पहिला चहा रोज आयता मिळावा॥
 
आज कुठली भाजी अन् आमटी करावी।
रोज रोज मला याची काळजी नसावी॥
 
कृपा मजवरी नित्य तुझी असावी।
कामाला 'बाई' देवा चांगली मिळावी॥
 
वाटेल तेव्हा मी, वाट्टेल ते खावे।
वजन माझे किंचित तरी ना वाढावे॥
 
मनावाटे तेव्हा शॉपिंग करावी।
कुठलीही ऑफ़र नाही सोडावी॥
 
सदा सर्वदा 'बॉस' प्रसन्न रहावा।
सुट्टी मागितली तरी ना चिडावा॥
 
वय माझे कितीही वाढत रहावे।
परी बालपण थोडे टिकून रहावे॥
 
नको रे मना काळजी ती कशाची।
मला दे कला आनंदी राहण्याची॥