शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. बालकथा
Written By

देव दव्हार्‍यात नाही....

एकदा वडील आणि मुलगी मंदिरात जातात. पार्‍या चढत असतानाच मुलगी अचानक किंचाळते. मंदिराच्या प्रवेशद्वारावरील खांबांवर सिंहाच्या मूर्ती कोरलेल्या असतात. मुलगी म्हणू लागते, की बाबा पळा, ते सिंह आपल्यावर हल्ला करतील.
 
वडील, मुलीच्या पाठीवर हात ठेवून तिला शांत करतात आणि समजावून सांगतात, की हे सिंह निर्जीव आहेत. ते फक्त दगडाचे पुतळे आहेत. ते आपल्याला काहीही करणार नाहीत.
 
त्यावर मुलगी विचारते, हे दगडाचे सिंह आपल्याला काही करणार नसतील तर मग दगडाची मूर्ती आपल्याला आशीर्वाद तरी कशी देईल?
 
संध्याकाळी वडील त्यांच्या दैनंदिनीत लिहितात...
माझ्या मुलीच्या तर्कावर मी अजूनही नि:शब्द आहे. त्यामुळेच आता मी मूर्तीपेक्षा जिवंत माणसांमध्ये देव शोधू लागलो आहे. मला देव भेटला नाही पण आयुष्यात अनेकदा मला माणुसकी भेटली आहे. त्यामुळेच आपल्या अवतीभवती असलेल्या लोकांसाठी चांगले काम करत राहा!