शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. बालकथा
Written By
Last Modified: शनिवार, 6 फेब्रुवारी 2021 (21:28 IST)

बिरबलाची खिचडी, अकबर बिरबल कथा

एकदा अकबर आपल्या खास मंत्र्यांना आणि बिरबला घेऊन बागेत फिरत होते. त्यावेळी खूप थंडी होती. तेव्हा एक मंत्री म्हणाला की किती थंडी आहे कोणी या थंडीत कामच करणार नाही सगळे आपल्या घरात बसले असतील .अकबर ने तलावाच्या पाण्याला स्पर्श केले पाणी खरंच खूप थंड  होते. 
अकबर म्हणाले की आपण बरोबर म्हणत आहात पाणी खूपच थंड आहे. या वर बिरबल म्हणाले की होय, महाराज थंडी तर आहे पण आपल्या राज्यात असे काही गरीब आहेत जे पैशासाठी काहीही करायला तयार आहे.
 
अकबर म्हणाले की बिरबल आपण आपल्या या गोष्टीला सिद्ध करू शकता का? आपल्या राज्यातून असा माणूस शोधून आणू शकता जो संपूर्ण रात्र या तलावाच्या थंड पाण्यात उभारेल. आम्ही त्याला 10 अशर्फी बक्षीस म्हणून देणार.
 
बिरबलाने होकार दिला आणि म्हणाले की मी आज संध्याकाळ पर्यंत असा माणूस शोधून आणेन. नंतर ते माणूस शोधायला निघाले.आणि संध्याकाळी परत आले आणि म्हणाले की मी असा माणूस शोधला आहे जो रात्र भर तलावाच्या या थंड पाण्यात उभारेल. 
 
अकबराने त्याला दरबारात हजर करण्यास सांगितले. तो व्यक्ती दरबारात आला.अकबराने त्याला विचारले की तुला बिरबलाने सगळं समजावून  सांगितले आहे न. त्या व्यक्तीने होकार दिले.अकबराने सूचना दिली की या व्यक्तीची  चांगल्या प्रकारे काळजी घ्या. कदाचित ही त्याची शेवटची रात्र असू शकते.
 
त्या रात्री तो व्यक्ती थंड पाण्यात उभारायला निघाला आणि संपूर्ण रात्र तो त्या थंड पाण्यात उभे राहण्यात यशस्वी झाला. सकाळी सगळ्यांना वाटले की रात्र भर थंड पाण्यात तो गारठून मरण पावला असेल. परंतु सकाळी त्याला राज दरबारात बघून सर्वाना आश्चर्य होतो. अकबराने त्याला विचारले की तू खरंच संपूर्ण रात्र थंड पाण्यात उभारला होतास का? त्याने होकार म्हणून उत्तर दिले आणि सैनिकांनी पण त्याची कबूली दिली.
 
अकबराने त्याला विचारले की एवढ्या थंड पाण्यात देखील तू कसं काय केले.त्यावर त्याने सांगितले की मी तलावाजवळ तेवत असलेल्या दिव्या कडे ध्यान लावले आणि त्यामुळे मला हे करणे शक्य झाले. 
 
अकबर म्हणाले की म्हणजे तुला त्या दिव्याच्या उष्णतेमुळे थंड पाण्यात देखील उष्णता मिळाली. ही तर फसवणूक आहे. तुला  या साठी बक्षीस तर नाही पण फसवणूक साठी शिक्षा देण्यात येईल. नंतर तो व्यक्ती तिथून निघून जातो. बिरबल देखील काही काम आहे असं सांगून निघून जातात. संध्याकाळी देखील बिरबल दरबारात येत नाही. 
अकबर सैनिकांना बिरबलाकडे पाठवतात आणि त्यांना तपास लावायला सांगतात की बिरबल आले का नाही. सैनिक जाऊन तपास लावतात आणि अकबराला येऊन सांगतात की बिरबल स्वयंपाक करीत आहे आणि ते म्हणाले की स्वयंपाक झाल्यावर मी स्वतः दरबारात येईन.
 
बऱ्याच वेळ झाला तरी बिरबल आले नाही तेव्हा अकबराने स्वतः जाऊन तपास लावायचे ठरवले. अकबर बिरबलाकडे गेले आणि त्यांनी बघितले की ते काही तरी  बनवत आहे आणि  त्या साठी पात्र अग्नी पेक्षा खूप उंच लावले आहे. अकबराने बिरबलाला विचारले की आपण हे काय करीत आहात? त्यावर मी खिचडी बनवत आहे असे सांगितले.पण आपण हे पात्र आगी पासून किती उंचावर ठेवले आहे खिचडी कशी काय शिजेल.
 
बिरबल म्हणाले ही खिचडी देखील तशीच बनेल ज्याप्रमाणे एका तेवत असलेल्या उष्णते मुळे एक व्यक्ती  संपूर्ण रात्र थंड पाण्यात काढू शकतो. त्याच प्रमाणे खिचडी देखील बनेल.
 
अकबराला आपल्या चुकीची जाणीव झाली आणि त्यांनी बिरबलाला म्हटले की आपण जिंकला मी हरलो. अकबराने त्या थंड पाण्यात संपूर्ण रात्र  उभारणाऱ्या व्यक्तीला 10 सोन्याच्या अशर्फी दिल्या आणि बिरबलाला म्हटले की आपण खूपच उत्तम प्रकारे मी केलेल्या चुकीची जाणीव करून दिली. असं म्हणत अकबराने बिरबलाचे खूप कौतुक केले.