शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. बालकथा
Written By
Last Modified: बुधवार, 20 फेब्रुवारी 2019 (14:26 IST)

नकारात्मक विचार करू नका!

एकदा एक व्यक्ती, दोरीने बांधलेला हत्ती घेऊन जात होता. दुसरा माणूस ते पाहत होता. तो आश्चर्यचकित झाला, की इतका मोठा प्राणी इतक्या लहान दोरीने कसा ओढला जात आहे. त्याने हत्तीच्या मालकाला विचारले, "हे कसे शक्य आहे की इतका मोठा प्राणी येवढ्या लहान दोरीला कसा काय तोडू शकत नाही आहे आणि तुझ्या मागे चालत आहे.  
 
हत्तीच्या मालकाने सांगितले, जेव्हा हे हत्ती लहान असतात तेव्हा त्यांना दोरीने बांधले जाते. त्या वेळी हे रस्सी तोडण्याचा प्रयत्न करतान पण ते त्यांना जमत नाही. पुन्हा-पुन्हा प्रयत्न केल्यानंतर देखील ते ती दोरी तोडू शकत नाही. तेव्हा हे हत्ती असा विचार करून घेतात की ते ही दोरी तोडू शकत नाही आणि मोठे झाल्यानंतर ते दोरी   तोडण्याचा विचार सोडून देतात.   
 
सार - आपण देखील अशा खूप नकारात्मक गोष्टी आपल्या डोक्यात बसवून घेतो आणि ठरवून घेतो की आपण हे काम करूच शकत नाही. आणि स्वत:ला एका अशा दोरीने बांधून घेतो प्रत्यक्षात राहतच नाही.