1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. बालकथा
Written By

बोधकथा : महाकपिचे बलिदान

Mahakapi's Sacrifice story
हिमलयाच्या जंगलात असे काही झाडे-रोप आहेत जे त्यांच्या काही वेगळेपणासाठी प्रचलित आहे. असे झाडे-रोप दुसरीकडे सापडत नाही. यांवर लागणारे फूल इतर फूलांपेक्षा वेगळे असतात. या झाडांवर लागणारे फळे एवढे गोड असतात की, यांना खाल्ल्याशिवाय राहू शकत नाही. असेच एक झाड नदीच्या किनाऱ्यावर होते. जिथे एक माकडांची टोळी आपल्या राजासोबत राहत होती. मकडांच्या राजाचे नाव महाकपि होते. महाकपि खूप समजूतदार आणि ज्ञानी होता. महाकपिचा आदेश होता की, त्या झाडावर एकही फळ सोडायचे नाही. फळे जशी पिकायला लागायची तशी ती माकडे ती सर्व फळे खाऊन टाकायची. महाकपि चे म्हणणे होते की जर एखादे फळ नदीत पडून मनुष्याजवळ पोहचले तर त्यांच्यासाठी ते हानिकारक असेल. सर्व माकडे महाकपिच्या या मताशी सहमत होते. व राजाच्या आज्ञेनेचे पालन करत होते. पण एक दिवस एक फळ नदीत पडले. ते फळ नदीतून वाहून एका जागेवर पोहचले. जिथे एक राजा आपल्या राणीसोबत फिरत होता. फळाचा वास एवढा छान होता की आनंदित होऊन राणीने आपले डोळे बंद केले. राजा देखील या वासाने मोहित झाला. राजाने आजूबाजूला पाहिले तर नदीमधुन त्याला एक फळ वाहत जातांना दिसले. राजने नदीमधुन ते फळ उचलून सैनिकांना दिले. आणि आदेश दिला की कोणीतरी या फळाला खावून सांगा की हे फळ चविला कसे आहे. एक सैनिकाने ते फळ खाल्ले व सांगितले की खूप गोड आहे. 
 
तसेच नंतर राजाने देखील ते फळ खाल्ले आणि आनंदित झाला. त्याने सैनिकांना आदेश देऊन ते फळांचे झाड शोधून आणण्यास सांगितले. खूप मेहनत नंतर सैनिकांनी ते झाड शोधले. नदीच्या किनाऱ्यावर ते सुंदर झाड त्यांच्या दृष्टीस पडले. पण त्यावर अनेक माकड बसली होती. सैनिकांना हे आवडले नाही त्यांनी एकएक करून माकडांना मारायला सुरवात केली. माकडांना जखमी पाहून महाकपिने हुशारिने काम केले. त्याने एक बांबू घेऊन झाड आणि डोंगराच्या मध्ये लावला व पूल बनवला महाकपिने सर्व माकडांना झाड सोडून डोंगराच्या त्या बाजूला जा असा आदेश दिला. माकडांनी महाकपिच्या आज्ञेनेचे पालन केले पण यादरम्यान काही घाबरालेल्या माकडांनी महाकपिला चिरडून टाकले. सैनिकांनी सर्व हकीकत राजाला सांगितली. राजा महाकपिच्या विरतेने प्रसन्न झाला आणि सैनिकांना आदेश दिला की महाकपिला लगेच महलात घेऊन या आणि त्याच्यावर उपचार करा. मग सैनिकांनी जेव्हा महाकपिला दरबारात आणले तोपर्यंत महाकपिने आपला प्राण सोडला होता. 
 
तात्पर्य- वीरता आणि समजूतदारपणा आपल्याला इतिहासाच्या पानात जागा देतो. तसेच कठिन काळात संकट आलेले असतांना विवेकी बुद्धीने काम करावे. 

Edited By- Dhanashri Naik