1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. बालकथा
Written By
Last Updated : बुधवार, 25 नोव्हेंबर 2020 (18:18 IST)

लाकूडतोड्याची गोष्ट

The Wood Cutter and Axe
एका गावात एक लाकूड तोड्या राहत होता. तो जंगलातून लाकडं कापून आणायचा आणि ते लाकडं विकून आपले पोट भरायचा. 
 
एके दिवशी तो लाकडं कापायला जातो. तो ज्या झाडाचे लाकूड कापत असतो ते झाड नदीच्या काठी असतं. लाकूड कापता-कापता त्याची कुऱ्हाड नदीच्या पाण्यात जाऊन पडते. तो फार गरीब असतो त्यामुळे त्याच्याकडे दुसरी कुऱ्हाड घेण्यासाठी पैसे देखील नसतात. तो मोठ्या-मोठ्याने रडू लागतो. 
 
त्याचे रडणे ऐकून त्या नदीतून एक देवी प्रगटते आणि त्याला रडण्याचे कारण विचारते. तेव्हा तो घडलेले सर्व सांगतो आणि माझी कुऱ्हाड मला परत द्यावी अशी विनवणी करतो. देवी पुन्हा नदीत जाते आणि त्याच्यासाठी सोन्याची कुऱ्हाड आणते आणि ही घे तुझी कुऱ्हाड असे म्हणते. या वर तो ही कुऱ्हाड माझी नाही असे उत्तरतो. मला माझीच कुऱ्हाड द्या असे म्हणतो. 
 
देवी पुन्हा पाण्यात जाते आणि त्याच्यासाठी चांदीची कुऱ्हाड घेऊन येते. घे बाळ! तुझी कुऱ्हाड असे म्हणते. पण या साठी देखील तो नकार देतो. नंतर ती देवी त्याला त्याचीच कुऱ्हाड आणून देते. त्या कुऱ्हाडाला बघून तो खूप आनंदी होऊन त्यांच्याकडून आपली कुऱ्हाड घेतो आणि त्यांना धन्यवाद देतो. 
 
नंतर देवी त्याच्या वर खूप प्रसन्न होते आणि म्हणते की बाळ! मी तुझी प्रामाणिक असण्याची परीक्षा घेत होते आणि तू त्या परीक्षेत पास झाला आहेस, त्या मुळे तुला बक्षीस म्हणून या सगळ्या कुऱ्हाड देत आहे. असे म्हणून ती देवी अंतर्ध्यांन होते. 
 
लाकूडतोड्याने खरे बोलले. त्यामुळे त्याला त्याच्या प्रामाणिक असल्याचे बक्षीस मिळतं. पुढे त्याचे आयुष्य फार आनंदात निघतं आणि तो आनंदात राहू लागतो.
 
बोध : नेहमी खरं बोलावं