शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. लव्ह टीप्स
Written By

या प्रकारे करा बायकोचा राग शांत

प्रसिद्ध दार्शनिक सुकरात यांच्या वैवाहिक जीवनातील एक किस्सा खूप प्रचलित आहे. यात बायकोचा राग कश्या प्रकारे शांत करावा याबद्दल कळून येतं. ही कहाणी आपल्यासाठीही मार्गदर्शक सिद्ध होऊ शकते.
 
महान युनानी दार्शनिक सुकरात यांच्या व्यवहारात मुळीच अहंकार नव्हता. सोज्वळ स्वभावाच्या सुकरात यांची पत्नी रागीट होती. लहान-सहान गोष्टींवर राग रुसवा चालत असे. सुकरात तिच्याशी वाद घालत नव्हते. ती भांडत असली तरी ते उत्तर न देत गप्प राहायचे. दुर्व्यवहाराची अती झाली तरी ते शांत बसायचे.
 
एकदा सुकरात आपल्या शिष्यांसह महत्त्वाच्या विषयावर चर्चा करत होते. त्या दरम्यान त्यांच्या पत्नीने हाक मारली परंतू सुकरात आपल्या चर्चेत एवढे गांगरले होते की त्यांना पत्नीची हाक ऐकायलाच आली नाही. सुकरात यांच्या पत्नीने अनेकदा हाक मारल्यावरही जेव्हा त्यांनी होकार दिला नाही तर तिचा पारा चढला. तिने शिष्यांच्या उपस्थितीत एक मटकाभर पाणी सुकरात यांच्यावर पालथे केले.
 
त्यावेळी शिष्यांच्या मनातील शंका ओळखून सुकरात शांत स्वरात म्हणाले- बघा, माझी पत्नी किती उदार आहे. एवढ्या भीषण उष्णतेत तिने माझ्यावर पाणी टाकून मला शीतलता प्रदान करण्याची कृपा केली. यावर आपल्या गुरुंची सहनशीलता बघून शिष्य श्रद्धेने नतमस्तक झाले आणि पत्नीचा क्रोधही शांत झाला. पत्नीच्या क्रोधावर सज्जनतेने उत्तर दिल्यास मोठा वाद टळला.