शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. लव्ह टीप्स
Written By

Romantic Relationship पार्टनरला रोमँटिक बनवण्याचे काही खास उपाय

आपले नाते रोमँटिक असावे असे जवळजवळ प्रत्येक व्यक्तीला वाटते. जर तुमच्या आयुष्यात भरपूर प्रणय असेल तर अनेक चिंता बर्‍याच प्रमाणात कमी होतात. तुमच्या जोडीदारासोबत घालवलेले प्रेमळ क्षण तुम्हाला तणावमुक्त करतात. प्रणयाचा प्रभाव माणसाला कधीच म्हातारा होऊ देत नाही. नात्यात उत्साह असणं खूप गरजेचं आहे. जर तुमचा जोडीदार प्रणयाबद्दल उदासीन असेल किंवा प्रणयाचे आकर्षण कमी झाले असेल तर काही टिप्स अमलात आणून पार्टनरला रोमँटिक करु शकता-
 
आपल्या जोडीदारामध्ये कामुकता वाढवण्यासाठी शुक्र ग्रहाला बळ देणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी शुक्ल पक्षाच्या शुक्रवारी शिवलिंगावर काही वस्तू अर्पित केल्याने सर्व सुरळीत होऊ शकतं. या दिवशी तुम्ही पिंडीवर तांदूळ, पांढरे चंदन, दही, माखणा, किंवा फळे तसेच शुद्ध तूप हे पदार्थ प्रियकराचे नाव घेत शिवलिंगावर अर्पण करावे.
 
शुक्र हा सुख वाढवणारा ग्रह आहे. सोबतच प्रत्येक सुखाचा आणि आरामाचा घटक आहे. घराच्या दक्षिण-पूर्व दिशेला कोणतेही कचरा किंवा शौचालय नसावे. दक्षिणेकडील भिंतींवर पर्वत किंवा दुःखाशी संबंधित चित्रे लावू नका.
 
जर तुमची इच्छा असेल की तुमच्या जोडीदाराने तुमच्या प्रेमात मग्न व्हावे आणि तुम्हाला हवं तसं वागवं तर वैजयंतीच्या फुलांचे दोन हार करून श्रीराधाकृष्ण मंदिरात जाऊन राधा - कृष्णाला अर्पण करा आणि तुमच्या जीवनात प्रेमाची फुले उमलावी अशी प्रार्थना करा.