नवरा होणे सोपे नाही

joke
नवरा बायकोच्या आयुष्यातील मजेशीर किस्सा

सकाळी एका पतीने आपल्या पत्नीला उठवलं.....
नवरा :- चल उठ.. आपण योगा क्लास ला जावूया...
बायको :- का हो.. मी तुम्हाला एवढी लट्ठ दिसते की काय..?
नवरा :- तसं नाही गं.. योगा हे निरोगी राहण्यासाठी... आपल्या फिटनेस साठी छान असतं..
बायको :- म्हणजे मी अनफिट आहे... आजारी आहे.. असं म्हणायचंय तुम्हाला..
नवरा :- जावू दे.. नसेल उठायचं तर...
बायको :- याचा अर्थ काय.? तुम्ही मला आळशी समजता की काय..?
नवरा :- हे बघ, तुझा गैरसमज होतोय..
बायको :- अरे देवा.. म्हणजे मला अक्कलच नाही.. इतकी वर्ष झालीत आपल्या लग्नाला..
आणि तुम्हीं म्हणताय मी तुम्हाला समजूं शकले नाही... माझा गैरसमज होतोय..
नवरा :- अगं मी तसं म्हणालो काय..?
बायको :- म्हणजे.... मी खोटं बोलत आहे तर..
नवरा :- ओके ओके... जाऊ दे..सकाळी सकाळी वाद कशाला..
बायको :- मी वाद घालते ?
मी वाद घालते.. ? तुम्हाला वाटतयं मी भांडखोर आहे...?
नवरा :- ठीक आहे... मी ही जात नाही फिरायला... योगा कैन्सल..
बायको :- बघितलंत, मुळात तुम्हाला जायचंच नव्हतं.. फक्त माझ्या डोक्यावर खापर फोडायचं होतं...
नवरा :- बरंय.. मी एकटाच जातो.. तू झोप आनंदात...
बायको :- जा जा.. एकटेच जा.. तसंही तुम्ही एकटेच सगळी मौज करता..
कधी माझी फिकिर केलीय का तुम्ही...
नवरा :- आता माझं डोकं गरगरतंय... चक्कर येतेय मला...
बायको :- येणारच... स्वार्थी आहात तुम्ही.. नेहमी स्वत:पुरताच विचार करता नां..!
बायकोच्या आरोग्याची अजिबात काळजी नाही तुम्हाला...! चक्कर येणारच..!
नवरा मौन..
नवरा (मनाशीच) च्यायला माझं चुकलं कुठे....??


यावर अधिक वाचा :

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...

कुणकेश्वरचा इतिहास

कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...

सफर निसर्गरम्य बूंदीची

सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

पलरुवी अर्थात  दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...

सुझान-हृतिक पुन्हा येणार एकत्र?

सुझान-हृतिक पुन्हा येणार एकत्र?
अभिनेता हृतिक रोशनची पूर्वाश्रमीची पत्नी सुझान खान हिने तिच्या 49 व्या वाढदिवसानिमित्त ...

कलर्स वाहिनीकडून जाहीर माफीनामा सादर

कलर्स वाहिनीकडून जाहीर माफीनामा सादर
‘मराठीची चीड येते’ म्हणत मराठी भाषेचा अपमान करणे गायक जान कुमार सानूला चांगलेच महागात ...

अक्षय कुमारच्या FAU-G गेमचा टीझर रिलीज

अक्षय कुमारच्या FAU-G गेमचा टीझर रिलीज
FAU-G गेमची प्रतीक्षा संपली आहे. या गेमचा फर्स्ट लूक जारी झाला आहे. दसर्याच्या मुहूर्तावर ...

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात 'या' चित्रपटाचे शूटिंग

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात 'या' चित्रपटाचे शूटिंग
पुण्याच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारामध्ये “नेल पॉलिश’ या चित्रपटाचे ...

कंगनावर आरोप, शूटिंगदरम्यान कोणाचेच ऐकत नाही

कंगनावर आरोप, शूटिंगदरम्यान कोणाचेच ऐकत नाही
कंगणावर (kangana ranaut) वारंवार असे आरोप लागले आहेत की, शूटिंगदरम्यान कंगना कोणाचेही ऐकत ...