गुरूवार, 21 ऑगस्ट 2025
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कविता
Written By
Last Modified: मंगळवार, 7 फेब्रुवारी 2023 (12:20 IST)

Marathi Kavita बोलणं, बोलण्यातला फरक

marathi kavita
बोलणं, बोलण्यातला फरक, खूप वेगळा असतो,
त्यानी कधी माणूस, कधी तुटतो कधी जोडतो,
कुणाचं बोलणं लाघवी, अगदी जवळ आणतो,
तर कुणाचं रोखठोक, अंतर राखतो,
कुणाचं बोलणं अगदी मधुर, वारंवार ऐकावं वाटत,
कुणी बोलत एकदम स्पष्टपणे, विचार करावा असा वाटतं,
मोघम पण बोलतात बरं कुणी कुणी,
नेमकं काय म्हणायचं आहे त्यांना?सांगेल का कुणी?
कुत्सित बोलणारे सुद्धा भेटताचभेटतात ,
तसे ते आपल्या आसपास च नेहमी असतात,
एकदाचे बोलून मोकळे होणारे ही असतात,
काही मात्र  आपल्या मनातल्या मनातच बोलतात,
अशी ही बोलण्याची दुनिया ही आपलीच असते,
आपल्याच लोकांची मनस्वी मात्र ती असते!
.....अश्विनी थत्ते.