शुक्रवार, 15 ऑगस्ट 2025
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कविता
Written By
Last Modified: सोमवार, 11 जानेवारी 2021 (17:58 IST)

आयुष्यात प्रत्येक वळणावर एक आधार!!

marathi poem
त्याची एक आश्वस्त नजर, मिळतो आधार,
कुणाची असते सोबत, मिळतो आधार,
कुणाचा खांद्यावर हात, एक भरभक्कम आधार,
कुणाचे प्रेमळ शब्द, वाटतो कित्ती आधार,
नुसतंच दिसणं ही असतं, कुणी आपला आधार,
आपल्या बाजूनं बोललं कुणी, सतत चा आधार,
माहितीय काहीही झालं तरी जाणार नाही कुठं,हक्काचा आधार,
धडपडलो कितीही, सवरणारे हात येताच, उभं राहायचा खम्बीर आधार,
...असाच हवा असतो आयुष्यात प्रत्येक वळणावर एक आधार!!
अश्विनी थत्ते.