गुरूवार, 21 ऑगस्ट 2025
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कविता
Written By
Last Modified: गुरूवार, 7 सप्टेंबर 2023 (18:35 IST)

मुलात मुलं होऊन जाणं, ही पण एक कलाच असते

Becoming a child is an art
केवढं कौतुक असतं न घरातल्या लहानग्याचं,
तो जसा करेल, तसं घरही वागत तसंच !
नाचायच असतं त्याला, पण मोठेच  नाचून दाखवतात,
गाडी गाडी करत, स्वतः च भुर्रर्र करतात,
बाऊ बाऊ करताना, उगा तोंडावर घेतात ओढून,
नकळत त्यांच्यातलं लहान मूल ही बघत डोकावून,
त्याच्याशी बोबडे बोलता बोलता खूप मजा लुटतात,
इवल्या इवल्या हाताने, काहीही खाऊन घेतात,
घरी कुणी आलं, की बाळाला काय काय येतं ते कित्तीदा सांगतात,
वारंवार त्याला ते करायला सांगून, बाकीचे विषयच बोलायला  विसरतात,
पण काहीही असो मंडळी, त्यातली मजा ही काही निराळीच असते,
मुलात मुलं होऊन जाणं, ही पण एक कलाच असते.
...अश्विनी थत्ते.