सरता सरता तुही देऊन गेलाच की बरंच काही
सरता सरता तुही देऊन गेलाच की बरंच काही,
आभार तुझं ही मनापासून, ठेऊ नकोस मनात किल्मीशही
देणं घेणं तर रितच आहे ना या जगाची,
मी ही त्याचाच गुलाम, मग तक्रार कशाची?
येतो आहे जो नवा तो घालव तू पाहिजे तसा,
त्यानेही काही योजले असेल, वाटेल हवा हवासा,
काळ गेला की नंतर वाटते, की आधीचा बरा होता,
वर्तमान घाबरवंत असतं आपल्यास, गड्या जो गेला तो ठीक होता!!
...अश्विनी थत्ते