1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी लेखक
Written By
Last Modified: गुरूवार, 30 सप्टेंबर 2021 (09:04 IST)

अनुवाद दिनानिमित्त परिचर्चा

Translation Day Discussion
30 सप्टेंबर जागतिक अनुवाद दिनानिमित्त शॉपिज़न. इन तर्फे एक परिचर्चेचे आयोजन करण्यात येत आहे. शॉपिज़न साहित्यिकांसाठी आणि कलावंतांसाठी एक मंच असून एक साहित्यिक वेबसाईट आहे जेथे जागतिक पातळीवर पाच भाषेत (हिंदी, मराठी, अंग्रेजी, गुजराती आणि बंगाली) ऑनलाइन साहित्याचे, प्रकाशन होत आहे. 
 
शॉपिज़न ह्या पाचही भाषेतील साहित्यिकांना एक नवीन मंच उपलब्ध करून देत आहे. त्याच अनुषंगाने ह्या परिचर्चेचे आयोजन करण्यात आले आहे..ह्या परिचर्चेत राष्ट्रीय व जागतिक पातळीवरील ज्येष्ठ श्रेष्ठ अनुवादक व साहित्यिक आपले विचार प्रस्तुत करतील. कार्यक्रमाची अध्यक्षता करतील ज्येष्ठ श्रेष्ठ अनुवादक व लेखक माननीय सुभाष नीरव जी. तसेच मुख्य अतिथी आहे कवी, अनुवादक आणि आलोचक माननीय संतोष एलेक्स जी. ह्या शिवाय मॅरिजाना जेंजिक (क्रोएशिया), डॉ वसुधा गाडगीळ, अंतरा करवडे, हर्षा गोखले व ऋचा दीपक कर्पे पण वार्ताहर म्हणून उपस्थित असणार आहेत. कार्यक्रम गूगल मीट वर होणार आहे.