शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी लेखक
Written By
Last Modified: पुणे , शनिवार, 2 जुलै 2016 (07:17 IST)

साहित्कि रा.चिं. ढेरे यांचे निधन

ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत आणि भारतीय संस्कृतीचे गाढे अभ्यासक-संशोधक डॉ. रा. चिं. ढेरे यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. ते 87 वर्षाचे होते. 
 
मराठीतील ज्येष्ठ लेखक, संशोधक रामचंद्र चिंतामण ढेरे यांचे शुक्रवारी त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. मागील काही दिवसांपासून ढेरे यांची प्रकृती ठीक नव्हती. शुक्रवारी राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली. भारतीय इतिहास, लोकसाहित्यासोबत प्राच्यविद्या संशोधनात त्यांनी अतुलनीय योगदान दिले. 
 
मिळालेले पुरस्कार
* साहित्य अकादमी पुरस्कार
 
1987 - ‘श्रीविठ्ठल: एक महासमन्वय’महाराष्ट्र साहित्य परिषदेचागं. ना. जोगळेकर पुरस्कार(2013) 
 
* त्रिदल फाउंडेशनचा पुण्यभूषण पुरस्कार (14 मार्च 2010) 
 
* पुणे महानगरपालिकेचा महर्षी वाल्मीकी पुरस्कार(2013) 
 
* अखिल भारतीय यादव महासंघाचा विशेष पुरस्कार (29-3-2015) 
 
* चिमण्या गणपती मंडळातर्फे लोकसंस्कृतीचे गाढे अभ्यासक व संशोधक रा. चिं. ढेरे यांना ‘साहित्य सेवा सन्मान’ त्यांच्या निवासस्थानी प्रदान करण्यात आला. (26-2-2016)