शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. »
  3. धर्मयात्रा
  4. »
  5. धर्मयात्रा लेख
Written By वेबदुनिया|

मोढेरा येथील सुप्रसिध्द 'सूर्यमंदिर'

-भीका शर्मा/ जनक झाला

धर्मयात्रेच्या या भागात आम्ही आपल्याला अहमदाबाद येथून 102 किमी अंतरावर असलेल्या पुष्पावती नदीच्या तीरावर असलेल्या सुप्रसिध्द सूर्यमंदिराचे दर्शन घडविणार आहोत. इ.स. पूर्व 1022-1063 मध्ये सम्राट भीमदेव सोलंकी यांनी 'सूर्यमंदिर' बांधले होते, असा उल्लेख मंदिराच्या गाभार्‍यात शिलालेखावर आढळतो. त्या काळात महमूद हमद गझनी या मुघल राजाने सोमनाथसह परिसर काबीज केला होता. गझनीच्या आक्रमणाचा धक्का बसून सम्राट सोलंकी यांनी स्वत:ची शक्ती व वैभव गमविले होते.

परिणामी सोलंकी साम्राज्याची राजधानी समजली जाणारे 'अहिलवाड पाटण' या शहराचे महिमा, गौरव व वैभव लोप पावत गेले. त्यानंतर सोलंकी राज परिवार व परिसरातील व्यापारी एकजूट होऊन त्यांनी या भव्य मंदिर स्थापन करण्‍यास मोठे योगदान देण्याचा निश्चय केला.
सोलंकी 'सूर्यवंशी' होते. अर्थात सूर्याला कुळदैवत मानत होते. आपल्या कुळदेवताची आराधना करण्‍यासाठी मोढेरा येथे भव्य सूर्यमंदिराचे निर्माण करण्यात आले.

भारतात तीन सूर्य मंदिरे आहेत. पहिले ओरिसामधील 'कोणार्क मंदिर', दूसरे जम्मू येथील 'मार्तंड मंदिर' व तीसरा गुजरात मधील मोढेरा येथील 'सूर्य मंदिर' होय.
WDWD

शिल्पकलेचा अद्‍भूत नमूना येथे बघायला मिळतो. इरानी शैलीतील या सूर्य मंद‍िराचे बांधकाम करताना कोण‍त्याच प्रकारचा चूना वापरलेला नाही, हे विशेष. अत‍िप्रचीन व सुप्रसिध्द सूर्यमंदिराचा गाभारा व सभामंडप अशा दोन भागात सम्राट भीमदेव यांनी बांधले आहे. सभामंडपात एकूण 52 स्तंभ असून त्यांच्यावर देवीदेवताच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत. काही स्तंभांवर रामायन व महाभारतातील प्रसंग कोरलेले आढळतात. सूर्यनारायणाचा पहिला किरण मंदिराच्या गाभार्‍यात पडतो. सभामंडपापुढे एक विशाल कुंड आहे, त्याला सूर्यकुंड अथवा रामकुंड असे म्हटले जाते.

WDWD
गुजरातमध्ये अल्लाउद्दीन खिलजी यांनी आक्रमन केले होते, तेव्हा सूर्यमंदिराचे खूप नुकसान झाले होते. सध्या भारतीय पुरातत्व विभागाकडून या मंदिराची देखरेख केली जात आहे.

इतिहासातील 'धर्मरन्य..!'
स्कंद पुराण व ब्रह्म पुराणानुसार प्राचीन काळात मोढेरासह परिसर 'धर्मरन्य' या नावाने ओळखला जात होता. रावणाचा संहार केलेल्या श्रीरामप्रभू यांना आत्मा शुध्दीसाठी 'धर्मरन्य' येथे जाण्‍याचा गुरू वशिष्ट यांनी सल्ला दिला होता.

कसे पोहचाल ?
महामार्ग- अहमदाबादपासून 102 किमी अंतरावर मोढेरा हे शहर आहे. मोढेरा येथे जाण्‍यासाठी अहमदाबादहून बस किंवा खाजगी वाहन सहज उपलब्ध होते.

रेल्वे मार्ग- मोढेरा येथे जाण्यासाठी सगळ्यात जवळचे रेल्वेस्थानक अहमदाबाद येथे आहे.

हवाई मार्ग- अहमदाबाद येथे सगळ्यात जवळचे विमानतळ आहे. तेथून मोढेरा हे 102 किमी अंतरावर आहे.