testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

शिवशंकराचे निवासस्थान- कैलास

mansarovar
आय. वेंकटेश्वर राव|
WD WD
भारतीय अध्यात्मात कैलास पर्वताचे स्थान अद्वितीय आहे. भगवान शंकराचे निवासस्थान म्हणून त्याची पौराणिक महती तर आहेच, पण आणि दर्शनशास्त्रातही या पर्वताचे महत्त्व अलौकीक आहे. म्हणूनच तप, तपश्चर्या यासंदर्भात कैलास पर्वताचे उल्लेख वारंवार येत असतात. त्याच्या पवित्र स्थानामुळेच त्याच्याभोवती एक गूढ पण अध्यात्मिक वलयही आहे. कदाचित त्यामुळेच या पर्वताची यात्रा हा अतिशय दिव्य व तितकाच पवित्र अनुभव ठरतो. >
mansarovar
WD WD
कैलास पर्वतावर प्रकाश व ध्वनी यांचा संगम होऊन त्यातून ‘ॐ’ च्या आवाजाची निर्मिती होते, असे मानले जाते. भारतीय अध्यात्मात, दर्शनशास्र्त्रात या पर्वातचे स्थान ह्रदयाच्या जागी आहे. कल्पवृक्षाची कल्पना जी पुराणात आहे, तो येथेच असल्याचे मानण्यात येते. या पर्वताच्या चारही दिशांना चार रत्नांची नावे आहेत. उत्तर बाजू ही सोन्याची आहे. ऐश्वर्य ज्याच्या पायी लोळण घेते त्या कुबेराची राजधानीही कैलासावर असल्याचे मानले जाते. विष्णूच्या पायातून निघालेली गंगा कैलासावर अभिषेक करते आणि येथे शिवशंकर तिला आपल्या जटेत धारण करतात. त्यातूनच गंगा पुढे वाहत जाते. >
mansarovar
WD WD
कैलासाचे स्थान केवळ हिंदूधर्मियांसाठीच महत्त्वाचे आहे, असे नव्हे, तर इतर धर्मातही त्याला तेवढेच मह्त्व आहे. कैलासावरच हे रूप बौद्धधर्मियांसाठी तेवढेच पवित्र आहे. बुद्धाच्या या रूपाला धर्मपाल असेही संबोधतात. येथे आल्यानंतर निर्वाणाची प्राप्ती होते, अशी त्यांची श्रद्धा आहे. त्याचवेळी जैन धर्माच्या पहिल्या तीर्थंकरानेही येथेच निर्वाणानुभव घेतला. गुरू नानक यांनीही निर्वाणासाठी कैलासाला येणेच पसंत केले होते, असे काहींचे म्हणणे आहे.

mansarovar
WD WD
मानसरोवरामुळे कैलास पर्वताचे अध्यात्मिक महत्त्व खूपच वाढले आहे. विलक्षण सौंदर्य आणि उच्च कोटीचा धार्मिक, पवित्र भाव येथे आल्यानंतर निर्माण होतो. मनोव्याधी झडून जातात. सर्व शरीर व मनात असा एक भाव निर्माण होतो, जो आपण कधीही अनुभवलेला नसतो. कैलासाचे महत्त्व वारंवार सांगितले जाते ते कदाचित यामुळेच असावे.

दर्शन-

राजा मानधाता यांनी मानसरोवर शोधून काढले असे मानले जाते. त्यांनी या सरोवराच्या किनाऱ्यावर बसून तपस्या केली होती. या सरोवरात असा एक औषधी वृक्ष आहे, ज्यामुळे सर्व प्रकारच्या शारीरिक व मानसिक रोगांवर उपचार करता येतो, असे बौद्ध धर्मियांचे म्हणणे आहे.

येथे जाण्यासाठी काही बाबींकडे मात्र लक्ष द्यावे लागते. या स्थानाची उंची साडेतीन हजार मीटरहून अधिक आहे. त्यामुळे ऑक्सिजन कमी आहे. परिणामी डोके दुखणे, श्वास घेण्यात अडचण, कसेनुसे वाटणे याचा अनुभव येऊ शकतो.

कैलास मानसरोवर येथे कसे जावे-
१. भारतातून रस्ता मार्गे- भारत सरकारतर्फे रस्तामार्गे या यात्रेचे आयोजन केले जाते. येथे पोहोचण्यासाठी २५-३० दिवस लागतात. त्यासाठी आगाऊ बुकींगही होते. ठरावीक संख्येतच लोकांना नेले जाते. त्याची निवड परराष्ट्र मंत्रालयातर्फे केली जाते.

२. हवाई मार्ग- काठमांडू येथे विमानाने जाऊन तेथून रस्तामार्गे मानसरोवर येथे जाता येते.

३. कैलासापर्यंत हेलिकॉप्टरनेही जाता येते. काठमांडूहून नेपालगंज व तेथून सिमीकोट येथे जाता येथे. तेथून हिलसापर्यंत हेलिकॉप्टरने जावे लागते. मानसरोवरापर्यंत जाण्यासाठी लॅंडक्रूझरचाही वापर करू शकता.

४. काठमांडूहून ल्हासा येथे चायना एअरची हवाई सेवा उपलब्ध आहे. तेथून तिबेटच्या शिंगोटे,ग्यांतसे, लहात्से, प्रयांग येथे जाऊन मानसरोवराला जाता येते.

संबंधित माहिती


यावर अधिक वाचा :

विजयादशमीला चुकून नका करू हे 7 काम

national news
विजयादशमी हा शुभ मुहूर्त असला तरी हे काम करणे टाळावे

दसर्‍याच्या दिवशी विड्याचे सेवन करण्यामागे हे आहे 4 कारण

national news
विजयादशमी अर्थात दसर्‍याचा सण संपूर्ण देशात साजरा करण्यात येतो. या दिवशी काही परंपरा ...

शमीपूजनाची गणेशपुराणात दिलेली कथा

national news
मालव देशात और्व नावाचा महाज्ञानी व तपोनिष्ठ ऋषी रहात असे. योगसामर्थ्याने त्याला वस्तू ...

करा दसरा पूजन आपल्या राशीनुसार

national news
रामाच्या दरबारात बेसनाचे लाडू चढवा. कर्क: देवी सीता आणि रामाला गोड पान अर्पित करा.

कोट्यधीश व्हायचे असल्यास दसर्‍याला करा नारळाचे हे 9 उपाय

national news
हिंदू धर्मात कोणत्याही धार्मिक कार्यात नारळाचे अत्यंत महत्त्व आहे. नारळाला श्रीफळ असेही ...

राशिभविष्य