श्रीकृष्णाचे डाकोरचे रणछोडरायजी रूप  
					
										
                                       
                  
				  				  
				   
                  				  				  													
						
																							
									   भारतीय अध्यात्मात श्रीकृष्णाला पूर्ण पुरूष मानले जाते. त्याच्या ठायी एवढी व्यक्तिमत्वे एकवटलीत की त्यातील नेमका श्रीकृष्ण कोणता हेही सांगता येत नाही. त्यामुळे खट्याळ, खोड्या काढणारा, धैर्यधर, रण सोडून पळणारा, अर्जुनाचा सल्लागार,  तत्वज्ञ अशी अनेक रूपे त्याची आहेत. आज आम्ही आपल्याला श्रीकृष्णाचे रणछोडरायजीच्या स्वरूपातील दर्शन घडविणार आहोत. त्यासाठी गुजरात येथील डाकोर येथे जावे लागेल. डाकोर येथील रणछोडदासजी मंदिराची उभारणी सन 1722 मध्ये केली गेली. डाकोरच्या रणछोडजी मंदिराच्या नामकरणाबद्दल महाभारतातील कथा आहे. श्रीकृष्ण व जरासंघ यांच्यात भीषण युध्द झाले होते. वचनानुसार श्रीकृष्णाला जरासंघाची हत्या				  
				  				  											 
						
	 
							
							 
							
 
							
						
						 
																	
									    करण्याची इच्छा नव्हती. त्याचा फायदा घेऊन जरासंघाने अधम माजवला होता. यादवसेनेचे मोठे नुकसान त्याने केले. अखेर श्रीकृष्णाने आपल्या अनुयायांच्या प्राणाचे रक्षण करण्यासाठी युध्द सोडून पळ काढला होता व या जागी ते लपून बसले होते. यावरूनच या मंदिराचे 'रणछोड'जी हे नाव प्रचलित झाले.भक्तांसाठी या मंदिराचे द्वारकेतील द्वारकाधीश मंदिराइतकेच महत्त्व आहे. दोन्ही मंदिरांमध्ये श्रीकृष्णाची मूर्ती श्वेत रंगाच्या दगडाचीच आहे. श्वेतरूपातील हा श्यामसुंदर खूपच मनोहारी आहे. गोमती नदीच्या काठी सफेद संगमरमराने या मंदिराची निर्मिती केली आहे. मुकूटाला सोन्याचे आवरण चढविलेले आहे. या ठिकाणी आल्यानंतर श्रीकृष्णनगरीत आल्याचे वाटते. चारी बाजूंनी हरे कृष्णाच्या स्वरात मधुर घंटानाद सुरू असतो.  				  
				  				  																	
									   हे मंदिर सकाळी 6 पासून दुपारी 12 पर्यंत दर्शनासाठी खुले असते. तसेच सायंकाळी 4 पासून 7 पर्यंत खुले असते. रोज सकाळी 6:45 वाजता मंगल आरतीचे आयोजन केले जाते. ही मंगल आरती मंगलभोग, बालभोग, श्रीनगरभोग, ग्वालभोग, व राजभोग असे नैवेद्य दाखवून होते. दुपारी उस्थापनभोग, शयनभोग व शक्तिभोग दाखविला जातो. दरवर्षी विशेष करून पौर्णिमेला लाखो भाविक डाकोर मंदिरात दर्शनासाठी येतात. डाकोरमधील महत्त्वाचे उत्सव कार्तिक, चैत्र,				  
				  				  																	
									    फाल्गुन व अश्विन पौर्णिमेला आयोजित केले जातात. त्यावेळी मंदिरात लाखापेक्षा जास्त भाविक दर्शनासाठी येतात. तुम्ही देखिल श्रीकृष्णाच्या भेटीसाठी आतूर असाल तर एकदा डाकोरच्या या मंदिराला अवश्य भेट द्या. एकदा इथे आल्यानंतर परत परत इथे यावेसे वाटते.डाकोरला कसे जाल?हवाई मार्गे -- अहमदाबादचे विमानतळ सर्वांत जवळ आहे.रेल्वे मार्ग -- डाकोर आनंद-गोधरा मोठी लाइन रेल्वे मार्गावर आहे.रस्ता मार्ग -- अहमदाबाद व बडोदा शहरातून डाकोरला जाण्यासाठी बस सेवा उपलब्ध आहे.