testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

ऑफिसचा पहिला दिवस!

ऑफिस जॉइन करायचा पहिला दिवस असेल तर उत्सुकता आणि भीतीसुद्धा मनात असते. सहकार्‍यांशी आपले संबंध कसे राहतील? ऑफिसातील लोक आपले मित्र बनतील की नाही? ते आपल्याशी कसे वागतील? आपल्याबद्दल काय बोलतील? अशा अनेक शंका-कुशंका मनात येत असतात. म्हणूनच ऑफिसमध्ये आपला प्रभाव चांगला पडावा यासाठी काही काळजी घेणे गरजेचे आहे...

ऑफिसमधील ड्रेसअप :

ऑफिसमध्ये पहिलाच दिवस असेल तर तुम्ही प्रोफेशनल ड्रेस घालणे योग्य.
तुमच्या पदावर तुमचा ड्रेस अवलंबून आहे. तुम्ही व्यवस्थापक पदावर असाल तर पँट- कोटाला प्राधान्य दिले पाहिजे.
पुरुष डार्क रंगाच्या ट्राउजरसोबत हलक्या रंगांचे शर्ट घालू शकतात. चेक्सचे शर्टसुद्धा चालतील पण चेक्स जास्त मोठे नसावेत.
मुली फॉर्मल ड्रेस घालू शकतात. साडी किंवा सलवार कमीज घालताना हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे की त्यांचे रंग जास्त डार्क नको.
ओव्हर मेकअप करणे टाळावे.
मुलांनी पहिल्या दिवशी बूट घालून जायला पाहिजे. बूट काळ्या रंगाचे असल्यास जास्त चांगले.
ऑफिसमध्ये कुठलाही ड्रेस कोड नसला तरी पहिल्या दिवशी जीन्स घालून जाणे टाळावे.
ऑफिसात पहिल्या दिवशी जास्त बोलू नये. कुठल्याही चर्चेवर लगेच आपली प्रतिक्रिया देणे टाळावे. आपले विचार त्यांच्यावर मांडू नये.
आपल्या सहकार्‍यांबरोबर औपचारिकपणे आपला परिचय द्यावा. पहिल्याच दिवशी एकदम फ्रेंडली होऊ नये. आपल्या सहकार्यांना समजून
घेण्याचा प्रयत्न करावा.
जे लोकं तुमची मदत करत असतील त्यांना धन्यवाद देण्यास विसरू नये. कारण भवितव्यात कधीही गरज पडल्यास ते तुमची मदत नक्कीच करतील.
ऑफिसमध्ये पहिल्या दिवशी उशीरा जाऊ नका. ऑफिसमधून निघतानासुद्धा वेळेचे लक्ष ठेवा.
तुमचे विचार नेहमी सकारात्मक असावे. काम करताना आत्मविश्वास दिसून यायला पाहिजे. पहिल्या दिवशी जर ऑफिसमध्ये कुठल्याही समस्येला तोंड द्यावे लागले तर लगेच त्याची तक्रार करू नका. यामुले तुमची सहनशक्ती दिसून येते.
पहिल्या दिवशी ऑफिसमध्ये काम कमी देण्यात येते. तुम्ही तुमचे काम लवकर पूर्ण झाले तर लगेच दुसरं काम मागायला संकोच करू नका.


यावर अधिक वाचा :

पब्जीचा नाद खोटा, कोयत्याने केले वार

national news
पुण्यातल्या हडपसर येथे पब्जी गेम खेळण्याकरिता मोबाईल मागितला असता एकाने तो न दिल्याने ...

आधार कार्डमध्ये तुमही घरी बसल्या बसल्या ऑनलाईन मोबाइल नंबर ...

national news
आधार कार्ड आजच्या काळात एक जरूरी ओळख पत्र आहे, पण त्रास तेव्हा होतो जेव्हा आम्हाला अचानकच ...

बॉस अनेकदा रडवतो

national news
जर आपण नोकरीत असाल तरी ही बातमी आपल्यासाठी आहे. एका शोधात उघडकीस आले आहे की दहामधून आठ ...

डेबिट कार्ड बंद करू इच्छित आहे एसआयबी

national news
देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयने डेबिट कार्ड बंद करण्याचा लक्ष्य ठेवला आहे. योजनेला यश ...

मंदीचा जबर फटका महिंद्राने कामावरून कमी केले १५०० कर्मचारी

national news
जगभरात मंदीचे ढग दाटू लागलेले असताना त्याची सर्वाधिक झळ भारतीय ऑटोमोबाईल कंपन्यांना बसू ...

हे एक सत्य

national news
लहानपणी आजी झोपताना कृष्णाची गोष्ट सांगायची. तुम्हालाही ही गोष्ट माहीत असणार. गोष्टीमधे ...

नवऱ्याची मैत्रीण ....

national news
तर अशा या नव-याच्या मैत्रिणीबद्दल बायकांचं काय म्हणणं असतं हे जगजाहीर आहे. पण लग्न ...

सावधान / गर्भवती महिलांना डासांचा (मच्छर) त्रास जास्त होतो

national news
पावसाळा आला की मोसम तर चांगला होतोच पण त्यासोबत आजारांचा धोका ही वाढून जातो. तसेच ...

रोजच्या दारू पिण्यानं आयुष्य होतंय कमी

national news
एका आठवड्यात अल्कोहोलचा समावेश असलेले साडेबारा ग्लास एखाद्यानं प्यायल्यानं पुढील धोका ...

केवळ 10 मिनिट टाळ्या वाजवण्याचे आरोग्यदायी फायदे

national news
हल्ली आपण बागेत लोकांना जोरजोरात टाळ्या वाजवतान बघत असाल तेव्हा मनात विचारही करत असाल की ...