रविवार, 26 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By
Last Modified: मंगळवार, 12 जानेवारी 2021 (11:14 IST)

गृहिणींसाठी वजन कमी करण्याचे 5 व्यायाम

आपण एक गृहिणी आहात? वाढत्या वजनाने त्रासलेल्या आहात? व्यायाम करण्यासाठी जिम जाऊ शकत नाही? एवढेच नव्हे तर घरात देखील व्यायाम करता येत नाही? तर काळजी करू नये आम्ही सांगत आहोत काही सोपे असे व्यायाम ज्यांना घरातच करून गृहिणी आपले वाढते वजन कमी करू शकतात. 
 
सकाळी उठून व्यायाम करणे तंदुरुस्त आणि सुंदर दिसण्याचा एक चांगला मार्ग आहे. पण आपल्याकडे पूर्ण व्यायाम करण्यासाठी पुरेसा वेळ नाही तर आपण काही खास व्यायाम करू शकता. ही आपल्या शरीरास जागृत ठेवण्यास, दिवसात पंप करण्यासाठी आणि निरोगी ठेवण्यासाठी मदत करते. तर या जादूच्या व्यायामामुळे वजन देखील कमी करू शकतो. चला तर मग काही अशा व्यायामांबद्दल जाणून घेऊया. परंतु ते करण्यापूर्वी आपल्या खोलीला हवेशीर करणे आणि स्नायूंना वार्मअप करणे देखील आवश्यक आहे.

1 स्ट्रेचिंग करणे -
दररोज स्ट्रेचिंग केल्यानं काही दिवसातच बदल जाणवेल. हे वजन कमी करण्यासह स्नायूंना आराम देण्यासाठी सर्वोत्तम आहे. या शिवाय स्ट्रेचिंग केल्यानं डोकं देखील शांत राहत.
करण्याची पद्धत -
* हे करण्यासाठी पाठीवर झोपा आणि बोटांना क्रॉस करा.
* हातांना जेवढे शक्य असल्यास खांद्यापासून लांब करा किंवा स्ट्रेच करा.
* बरं वाटे पर्यंत हा व्यायाम करा.

2 कॅण्डल व्यायाम - हा व्यायाम केल्यानं सेरेब्रल रक्त प्रवाह (सीबीएफ)सुधारण्यास मदत मिळते, ज्या मुळे आपल्या संपूर्ण शरीरावर फायदेशीर प्रभाव पडतो, नियमितपणे व्यायाम केल्यानं वजन कमी होण्यासह स्मरणशक्ती, मानसिक कार्य प्रदर्शन आणि कार्यक्षमता सुधारते. ज्यामुळे झोप चांगली येते. श्वसन संबंधीत समस्या दूर होतात.
करण्याची पद्धत -
* हा व्यायाम करण्यासाठी पाठीवर जमिनीवर झोपा.
* पाय छताकडे न्या.
* या स्थितीमध्ये आल्यावर आधारासाठी हातांना कुल्हे किंवा पाठीच्या खालील बाजूस ठेवा. 
* पायाची बोटे छताकडे करा.
* लक्षात ठेवा की हा व्यायाम करताना मानेच्या स्नायूंमध्ये ताण नसावा.
* हा व्यायाम अधिक श्वासचक्रात करा.
 
3 स्फिंक्स आणि कोब्रा पोझ-
 हा व्यायाम वजन कमी करण्यासह पाठीला बळकट करतो आणि मणक्याला लवचीक बनवतो. या शिवाय हा व्यायाम केल्यानं पोटाशी निगडित त्रासाला दूर करण्यात मदत मिळते.
करण्याची पद्धत -
* हे करण्यासाठी पोटावर झोपा.
* फोरआर्म्स वर वाकून डोकं वर उचला.
* फोरआर्म्स एकमेकांच्या समांतर ठेवा.
* खांदे खाली करा आणि पायाच्या बोटांकडे केंद्रित करा.
* हे 'स्फिंक्स' आहे. डोकं हाताने उचलणे आवश्यक आहे.
* पाठी कडून पुढे आणि वर बघायचे आहे. ही पोझ कोब्रा पोझ आहे.
* 'स्फिंक्स' पोझ वर परत या.
* हा व्यायाम अनेक श्वासचक्र घेण्यासाठी करावं.
 
4 एम्ब्रोझ पोझ-
हा व्यायाम वजन कमी करण्यात मदत करण्यासह पचन अवयवांना उत्तेजित करतो आणि सांध्यातील कॅल्शियम जमा होण्यापासून रोखतो. या शिवाय हात, खांदे आणि मानेच्या स्नायूंना बळकट करतो आणि कुल्हे आणि गुडघ्याची लवचिकता वाढवतो.
करण्याची पद्धत -
* हा व्यायाम करण्यासाठी गुडघे दुमडून कुल्ह्यांना टाचांपर्यंत लावा.
* पुढे वाकून पाठीला शक्य तितके गोल करा.
* हात गुडघ्याच्या भोवती ठेवा आणि पुढे स्ट्रेच करा.
* अनेक श्वास चक्र घेण्यासाठी हा व्यायाम करा.  
 
5 ट्विस्टिंग व्यायाम-
हा व्यायाम आपल्या मणक्याच्या हालचाली आणि लवचिकता सुधारण्यासाठी आहे. हा स्नायूला ताणतो आणि कंबरेच्या आकाराला कमी करतो. पाठदुखीपासून बचाव करण्यासाठी उत्तम मार्ग आहे.
करण्याची पद्धत -
* उजवा पाय सरळ करून जमिनीवर बसा.
* डावा पाय उजव्या मांडीच्या बाहेर जमिनीवर ठेवा.
* डोकं उलट दिशेला फिरवा. असं करताना उजवा हात जमिनीवर आणि डावा हात गुडघ्यावर असावा.
* दुसऱ्या दिशेने व्यायामाची पुनरावृत्ती करा.
* लक्षात ठेवा की डोकं उलट दिशेने फिरवायचे आहे.
* आपल्याला बरं वाटे पर्यंतच हा व्यायाम करा. परंतु श्वास घेण्याच्या चक्राला विसरू नका.
* आपण हा व्यायाम सकाळीच नव्हे तर दिवसा देखील करू शकता. हा व्यायाम वजन कमी करण्यासह तणाव दूर करण्यात आणि आराम देण्यास मदत करतो.