testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

फुलझाडांनी सजवा बाल्कनी

plants
झाडे, रोपट्यांसाठी ऊन अत्यावश्यक असते. हे सगळ्यांनाच माहीत आहे; पण काही रोपटे अशीही असतात, जी कमी उन्हातही जोमाने वाढतात. घर सजावटीसाठी अशी रोपटी उत्तम ठरू शकतात. कमी ऊन मिळत असेल अशा ठिकाणी सुंदर पानाचे विविध प्रकारचे पाम, फायकस, फर्न, मनी प्लांट, क्रोटन, मोनस्टरा आदी झाडे लावली जाऊ शकतात.बाल्कनीच्या भिंती व खांबावर रोपट्याच्या कुंड्या टांगल्या जाऊ शकतात. आजकाल लोखंडी तारांनी बांधलेल्या प्लास्टिकच्या टोपल्या बाजारात मिळतात. त्यांच्यातही ही झाडे लावता येतात. बाल्कनीत रेलिंग असेल, तर त्यात कुंड्या ठेवल्या जाऊ शकतात. फक्त कुंड्यातून पाझरणारे पाणी खाली पडणार नाही, यासाठी त्याच्या खाली एक भांडे ठेवण्याची काळजी घेणे गरजेचे आहे. रेलिंगच्या आसपास द्राक्षाची वेल वा टिकोमा लटकवला जाऊ शकतो.
त्यातून बाल्कनीचे सौंदर्य आणखी वाढेल. बाल्कनी छोटी असेल तर कुंड्याऐवजी तिथे फक्त लटकणारी रोपटी लावावीत. समजा बाल्कनीत
पुरेशी जागा असेल तर कुंड्यांमध्ये पालक, भेंडी, टोमॅटो, कोथिंबीर, मिरची, कारली आदी भाजीपाल्याचीही लागवड करता येऊ शकते.

बाल्कनीमध्ये चिनी माती, लाकूड, प्लास्टिक वा बांबूपासून बनलेल्या वस्तूंचा वापर रोपटी लावण्यासाठी केला जाऊ शकतो. पावसाळ्याच्यादिवसांमध्ये नवरंग, मुर्गकेश आदींसारखी रोपटी कुंड्यामध्ये लावली जाऊ शकतात, तर हिवाळ्यात झेंडूसारखी फुलझाडे लावता येतात.

गुलाब, रातराणी, टिकोमा, बोगनवेलिया यासारखी बारमाही फुलांची रोपटीही बाल्कनीतील कुंड्यांमध्ये लावता येतात; मात्र बाल्कनीमध्ये
जागेचा अंदाज न घेता झाडांची गर्दी होणार नाही, याची काळजी घेणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. जेवढय़ा झाडांची काळजी घेणे सोयीचे जाईल,तेवढी लावणे आवश्यक आहे.


यावर अधिक वाचा :

सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावावर शुक्रवारी चर्चा

national news
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ‘तेलुगू देसम’च्या खासदारांनी दाखल केलेला ...

विराटचे फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थान कायम

national news
भारतीय कर्णधार विराट कोहलीने आयसीसीच्या एकदिवसीय क्रिकेटमधील फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल ...

सोने-चांदीच्या दरात घसरण

national news
गेल्या चार दिवसात सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. सोन्याला दरात 600 ते 800 रुपयांची ...

गूगलला 4.3 अब्ज युरोचा दंड

national news
आपली मक्तेदारी रहावी याकरिता गूगलने अ‍ॅन्ड्राईड या ऑपरेतींग सिस्टिमचा चूकीचा वापर ...

पहिल्या 3 कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा

national news
इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या 3 सामन्यांसाठी भारतीय ...