शुक्रवार, 29 ऑगस्ट 2025
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By
Last Modified: सोमवार, 23 जानेवारी 2023 (14:04 IST)

Home Remedies : घरात उंदीरचा त्रास असल्यास या टिप्स अवलंबवा

Follow these tips if you have a rat problem at home
घरांमध्ये उंदीर असणे खूप सामान्य आहे. एकदा का घरात उंदरांची दहशत सुरू झाली की त्यांना घरातून काढणे फार कठीण होऊन बसते. उंदीर तुमच्या स्वयंपाकघरातील सामानाचीच नासाडी करत नाहीत तर कपड्यांपासून पुस्तकांपर्यंत आणि इतर अनेक गोष्टींचेही नुकसान करतात.घरात उंदीर झाले असल्यास हे उपाय अवलंबवा.चला तर मग जाणून घेऊ या.
 
पेपरमिंट तेल वापरा
पेपरमिंट तेलाचा वास सर्वांनाच आवडतो, पण उंदरांना हा वास आवडत नाही. या साठी कापसाचे गोळे  पेपरमिंट तेलात बुडवून  घर, स्वयंपाकघर, पोटमाळा किंवा उंदीर असलेल्या भागात पसरवावे लागतील. यामुळे तुमच्या घरातून उंदीर दूर होतील. एवढेच नाही तर तुम्ही तुमच्या घरात पुदिन्याची रोपे वाढवू शकता. यामुळे तुमच्या घरात उंदीर येण्यापासूनही बचाव होईल.
 
काळी मिरी वापरा
उंदीर वास घेण्यास अत्यंत संवेदनशील असतात आणि म्हणून तीक्ष्ण वास त्यांना दूर नेण्यास मदत करतो. तीक्ष्ण वास त्यांना असह्य होतोच, पण त्यामुळे त्यांना श्वास घेणेही कठीण होते. तुम्हाला फक्त एंट्री पॉइंट्स आणि उंदरांच्या कोपऱ्याभोवती मिरपूड शिंपडायची आहे.
 
कांदा आणि लसूण कामी येईल -
कांदा आणि लसूण हा देखील उंदरांपासून सुटका करण्यासाठी एक उत्तम घरगुती उपाय आहे. हे वापरण्यास देखील खूप सोपे आहे. फक्त काही चिरलेला कांदा त्यांच्या छिद्र किंवा प्रवेशद्वाराच्या बाहेर ठेवा. त्यांना तुमच्या घरात प्रवेश करण्यापासून परावृत्त करण्यासाठी हे पुरेसे असेल. परंतु कांदे वापरताना तुम्हाला जास्त सावध राहावे लागेल कारण ते दोन दिवसात सडतील आणि तुम्हाला ताजे कांदे बदलून घ्यावे लागतील. कुजलेले कांदे फेकून द्या कारण ते मुलांसाठी आणि पाळीव प्राण्यांसाठी विषारी असू शकतात. त्याचप्रमाणे तुम्ही लसूण ठेचून पाण्यात मिसळून स्प्रे करून वापरू शकता.
 
Edited By - Priya Dixit