गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By
Last Modified: बुधवार, 19 मे 2021 (17:23 IST)

लॉकडाउनमध्ये जोडीदाराबरोबर भांडण होत असल्यास,हे उपाय करा

If you have an argument with your spouse in a lockdown
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सर्वत्र थैमान मांडले आहे.हजारो लोक या आजाराला बळी गेले आहे. लोक लॉकडाउन मुळे घरातच आहे आणि ते घरातूनच काम करीत आहे. या लॉकडाउन चा परिणाम प्रेमी युगलांवर देखील झाला आहे. त्यांना भेटता येत नाही. या मुळे त्यांच्या नात्यात दुरावा येत आहे. भांडणे होत आहे.या साठी काही उपाय करून आपण त्यांचा राग दूर करू शकता.    
 
* भेटवस्तू पाठवा -या लॉक डाउन मुळे बाहेर जाणे सुरक्षित नाही.जर आपला जोडीदार रागावला आहे तर आपण त्याचा साठी  काही भेटवस्तू देखील पाठवू शकता. त्यांचा आवडीची वस्तू पाठवा या मुळे त्यांचा राग शांत होईल.  
 
* व्हिडीओ कॉल करा- सध्या लॉक डाउन मध्ये व्हिडीओ कॉल करून आपण रुसलेल्या जोडीदाराला मनवू शकता. जर आपण चुकला आहात तर व्हिडीओ कॉल करून माफी मागू शकता.असं केल्याने आपले नाते दृढ होतील.  
 
* कविता ऐकवून - जर आपल्याला आणि आपल्या जोडीदाराला कविताची आवड आहे तर आपण जोडीदाराला कविता ऐकवू शकता. असं केल्याने त्यांना छान वाटेल. आपसातील भांडणे देखील संपतील.
 
 * त्यांच्या आवडीचे करा - प्रत्येकाला काही न काही आवडते. जर आपल्या जोडीदाराला देखील असे काही आवडत असेल तर आपण ते करू शकता. आपण त्यांच्या सह व्हर्च्युअल कॅण्डल लाईट डिनर घेऊ शकता.