testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

पावसात चिंब फुटबॉल

football
रुपाली बर्वे|
उन्हाळ्यानंतर पहिल्यांदाच एवढा पाऊस पडत होता की मन मोरासारखे पीस पसरवून नाचावे असे होऊ लागले होते तिला...खिडकीतून पाऊस बघत तिने आवाज दिला मन्या चलतोस का? काहीच उत्तर मिळाले नाही..
ती पुन्हा अजून जोरात बोलली... चलतोस का रे? पुन्हा उत्तर नाहीच... वळून बघते तर मन्या मोबाइलमध्ये डोकं खुपसून डोळे फोडत बसला होता... मोबाइलने जणू डोळे, कानासकट मेंदूची अगदी वाट लावली होती...

आईने एक क्षणही विचार न करता दारं उघडलं आणि अंगणात जाऊन दोन्ही हात पसरवून उभी झाली. धो धो पाऊस अंगावर पडू लागलं आणि आत्मा तृप्त होत होती. तेवढ्यात हे काय तर फुटबॉलचा आवाज येऊ लागला.... मन्याचं लक्ष वेधलं गेलं. फुटबॉल वर केवढा जीव होता त्याचा.. किती हठ्ठ केल्यावर वडिलांनी दहाव्या वाढदिवसाला आणून दिला होता...आता फुटबॉल आवाज ऐकताक्षणी बाहेर नजर पडली तर आई पूर्ण भिजलेली आणि हातात फुटबॉल आणि तिची हास्य स्मित आणि हसरे डोळे मन्या जणू पहिल्यांदाच बघत होता. नाही तर घरात किंवा अंगणात फुटबॉलचा आवाज जरी केला तरी चिडायची... जा ग्राउंडवर जाऊन खेळ...
मन्या लगेच उठला आणि आईच्या डोळ्यांच्या इशारा बघत पावसात पहिलं पाऊल टाकलं आणि लगेच पुन्हा
दोन पाऊल मागे सरकला...आई तू... हे म्हणे पर्यंत आईने त्याला खेचले आणि फुटबॉल त्याकडे सरकवला...मग काय दोघांनी धमाल केली... मोबाइल की हे निसर्गात खेळणे यातून काय सुंदर हे मन्याने ठरवले होते...


यावर अधिक वाचा :

सिद्धू वादात सापडला, गळाभेट आली वादात

national news
पाकिस्तानमध्ये इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी गेलेले भारताचे माजी क्रिकेटपटू ...

एसबीआयकडून पूरग्रस्तांना मोठी मदत

national news
केरळमध्ये आलेल्या पूराने जनजीवन प्रचंड विस्कळीत झाले आहे. आता स्टेट बँक ऑफ इंडिया ...

केरळला 500 कोटींची तातडीची मदत जाहीर

national news
केरळमध्ये आलेल्या महापुरात तीनशेहून अधिक बळी गेले असून हजारो कोटींचे नुकसान झाले आहे. तर ...

पुण्यात प्रेयसीला सॉरी म्हणण्यासाठी 300 बॅनर

national news
प्रेमात रुसवा- फुगवा असतोच पण प्रेयसीला सॉरी बोलण्यासाठी भर रस्त्यात 300 बॅनर लावण्याचा ...

केरळ: पुरात नेव्हीच्या प्रयत्नामुळे बाळाचा जन्म, गर्भवती ...

national news
केरळमध्ये मागील 100 वर्षातील सर्वात भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. पुरामुळे लोकं हादरले ...