शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By

तुमच्यासोबत असं घडतं असेल तर समजा पालटणार नशीब

आमच्या सोबत दिवसभर घडत असलेल्या काही घटना अगदी सामान्य असल्या तरी ते काही संकेत देऊन जातात. शास्त्राप्रमाणे अनेक घटना शकुन- अपशकुन किंवा शुभ- अशुभ संकेत देतात. तर आज आपण बोलू या शकुनाबद्दल. लहान-लहान गोष्टी भविष्याचे संकेत देऊन जातात. या घटनांवरून आपण भविष्यात घडणार्‍या शुभ काळाचा अंदाज बांधू शकतो. तर आपण ही ओळखून घ्या त्या शुभ संकेतांबद्दल...
 
घराच्या अंगणात तुळस उगवणे. आता आपण स्वत: रोप लावलं असेल तर गोष्ट वेगळी परंतू घरातील बागेत आपोआप तुळशीचे रोप उगवले तर याला शुभ संकेत समजावं. तसंच अनेकदा प्रयत्न करून देखील तुळस येत नाही किंवा वाळून जाते अशात आपोआप तुळस येणे म्हणजे घरात प्रभू विष्णू आणि लक्ष्मीचा वास राहणार असल्याचे संकेत आहे.
 
तसेच आपोआप दूर्वा उगवणे देखील शुभ संकेत आहे. घरातील बागेमध्ये गणपतीला अर्पित केली जात असलेली दूर्वा उगवल्यास आता आपल्या कोणत्याही कामात अडथळे निर्माण होणार नाही असे समजून घ्यावे. 
 
तसेच नारळ देखील शुभ संकेत देतं. जर घरात एखादे नारळ ठेवलेलं असेल आणि नारळाला आपोआप तडा गेल्यास समजावे की नारळाने घरातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेतली आहे. यानंतर आपल्याला कोणत्याही कामात अडथळे निर्माण होणार नाही. सकारात्मकता जाणवेल आणि कामात यश मिळेल.
 
तसेच मध देखील शुभ संकेत देतं. घरात मध ठेवलेलं भांडे फुटून मध पसरल्यास नकारात्मक ऊर्जा दूर होतं आहे असे समजावे. याने घरात एखादं मंगळ कार्य होण्याची देखील शक्यता वाढते.
 
तसेच अगदी सामान्य घडणारी गोष्ट म्हणजे पुरुष कपडे घालतात तेव्हा घडते. कपडे घालताना खिशातून नाणे खाली पडणे. कपडे घालताना खिशातून पैसे किंवा नाणे पडणे शुभ संकेत देतात. याने आर्थिक स्थिती मजबूत होण्याचे संकेत मिळतात. धन लाभ होण्याची शक्यता वाढते. तर आता खिशातून नाणे पडले आनंदी व्हा.