शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By
Last Modified: मंगळवार, 3 नोव्हेंबर 2020 (09:58 IST)

मुलांचे अभ्यासात लक्ष लागत नसेल तर हे करुन बघा

आजच्या काळात अभ्यास आणि करियर करण्यासाठी स्पर्धा वाढतच आहे. प्रत्येक पालकांना असे वाटते की त्यांच्या मुलांनी चांगला अभ्यास करावा, अभ्यासात आपले मन लावावे. पण कधी-कधी मुलांचे मन अभ्यासात लागत नाही. ते अभ्यास करताना आपले लक्ष केंद्रित करू शकत नाही. ज्यामुळे त्यांच्या पालकांना  तणाव येऊ लागतो. 
 
वास्तू मध्ये प्रत्येक जागेचे काही नियम असतात. वास्तू शास्त्रानुसार अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी अभ्यास करण्याची जागा किंवा अभ्यासाची खोली व्यवस्थित असणे आवश्यक असतं. अभ्यासाच्या खोलीचे वास्तू योग्य नसल्याने लक्ष एकाग्र होत नाही. म्हणून वास्तूच्या काही गोष्टीना लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
 
* वास्तुशास्त्रानुसार, कधीही बीम खाली बसून अभ्यास करू नये. या मुळे अभ्यासात योग्य प्रकारे एकाग्रता मिळत नाही. म्हणून अभ्यासाच्या खोलीत बीम बनवू नये. बीम असल्यास त्यावर एक बासरी लटकवून द्यावी. जेणे करून त्या जागेचा वास्तू दोषाचा प्रभाव कमी होईल.
 
* वास्तुनुसार मुलांची अभ्यासाची खोली, उत्तर दिशेला, पूर्व दिशेला किंवा उत्तर-पूर्व दिशेला (ईशान्य) दिशेने बनवावी. अभ्यासाच्या खोलीत पुस्तकांची जागा नेहमी पूर्वी कडे किंवा उत्तर- पूर्व दिशेला असावी.
 
* मुलांच्या अभ्यासाच्या टेबलावर ग्लोब किंवा तांब्याचे पिरॅमिड ठेवणं योग्य असतं. या मुळे मुलांना अभ्यासात एकाग्रता ठेवणं सोपं होतं. 
 
* अभ्यासाच्या खोलीत बुद्धीचे देव गणपती किंवा ज्ञानाची देवी सरस्वतीचे चित्र लावू शकता.
 
* जर का कोणत्या कारणास्तव मुलं झोपण्याच्या खोलीतच अभ्यास करतात तर अभ्यास करताना त्यांचे तोंड नेहमीच पूर्व दिशेला किंवा उत्तर दिशेला असावे.
 
* अभ्यास करताना मुलांनी आपले तोंड कधी ही दक्षिणेकडे करू नये. या मुळे त्यांचा मध्ये अनुशासनहीनतेचा भाव उत्पन्न होतो.
 
* अभ्यासाच्या जागेवर पिण्याचे पाणी आणि घड्याळीची व्यवस्था नेहमी पूर्वीकडे किंवा उत्तरेकडे असावी.
 
* ज्या मुलांचे लक्ष अभ्यासात लागत नाही त्यांच्या अभ्यासाच्या खोलीत मोरपीस लावावे. जेणे करून अभ्यासात त्यांची एकाग्रता वाढेल.