testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

वास्तूप्रमाणे नवीन घरात देवघर कुठे असावे

vastu
वेबदुनिया|
देवघर बनवताना व पूजा करताना काही बाबींकडे लक्ष देणे गरजेचे आहे
देवघर वरून नेहमी चपटे असावे. देवघर ईशान्य कोपर्‍यात असायला पाहिजे. हे शक्य नसेल तर पूर्व किंवा पश्चिम दिशेला असायला पाहिजे.
देवघरात कुलदेवता, देवी, अन्नपूर्णा, गणपती, श्रीयंत्राची स्थापना करायला पाहिजे.
तीर्थक्षेत्रांतून विकत घेतलेल्या वस्तू देवघरात ठेवणे टाळायला हव्यात. पारंपरिक मूर्तींचीच पूजा केली पाहिजे.
मुर्तींची स्थापना आसनावर करून पूजा करताना देखील आसनावर बसून पूजा केली पाहिजे.
मूर्ती 4 इंचाहून जास्त उंच नको.
नाचणारे गणपती, तांडव करत असलेले शंकर, वध करताना कालिका आदी मुर्ती किंवा फोटो देवघरात ठेवू नये.
महादेवाची लिंगाच्या रूपात आराधना केली पाहिजे. मूर्तीच्या स्वरूपात नाही.
पूजा करताना तोंड उत्तर किंवा पूर्वेकडे असायला पाहिजे.
दिवा आग्नेय कोपर्‍यात (देवघराच्या) असायला पाहिजे. पाणी उत्तरेकडे ठेवायला पाहिजे.
पूजेत शंख-घंटीचा उपयोग जरूर करावा.
निर्माल्य-पुष्प-नारळ इत्यादी पूजेनंतर विसर्जित केले पाहिजे. ते घरात ठेवणे वर्जित आहे.
पूजेचे पवित्र जल घराच्या प्रत्येक कोपर्‍यात शिंपडायला पाहिजे.
नैवैद्य नेहमी गोड वस्तूंचा दाखवावा.
खंडित झालेल्या मूर्तींचे विसर्जन केले पाहिजे. विसर्जनाच्या अगोदर त्यांना नवैद्य दाखवाला.


यावर अधिक वाचा :