शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By वेबदुनिया|

घर बांधताना काय काळजी घ्याल?

प्लॉट खरेदी केल्यानंतर घर बांधताना आपल्याला खूप गोष्टींचा विचार करावा लागतो. प्लॉटच्या चारही बाजूंनी येणारे रस्ते, प्लॉटची लांबी-रूंदी, प्लॉटवर असलेली झाडे आदी गोष्टी लक्षात घेऊन घराचे बांधकाम करावे लागत असते. घर बांधताना वास्तुशास्त्राचा आधार घ्यावा लागत असतो. वास्तुशास्त्रात घर कुठे बांधावे व कुठे बांधू नये, या संदर्भात काही नियम व माहिती सांगितली आहे. ती पुढील प्रमाणे...

* ब्रह्मदेव, विष्णू, सूर्य, शिवशंकर तसेच जैन मंदिरासमोर किंवा मागील प्लॉटवर घराचे बांधकाम करू नये.

* घर बांधताना उत्तर, पूर्व व इशान्य दिशेला अधिक जागा सोडावी. घराच्या छताचा उतारही उत्तर किंवा इशान्य दिशेला केला पाहिजे. घरातील नळ किंवा घराबाहेर केलेली बोअरवेल ईशान्य किंवा नैऋत्य दिशेच्या कोपर्‍यातच पाहिजे.

* खिडक्या पूर्व व उत्तर दिशेला जास्त प्रमाणात ठेवल्या पाहिजेत. दक्षिण दिशेला खिडक्या ठेवू नये. ईशान्य कोपर्‍यात स्वयंपाक खोली ठेवावी. आउट हाऊस नेहमी पश्चिम किंवा दक्षिण दिशेला व गाडी ठेवण्याचे शेड पूर्व किंवा उत्तर दिशेला बनवले पाहिजे.

घराचा मुख्य दरवाज्याचेही काही नियम आहेत...

* घराच्या मुख्य दरवाज्यासमोर रस्ता नसावा. दरवाज्यासमोर रस्ता असल्यास आपल्या विकासात बाधा येते.
* दरवाज्यासमोर मोठे झाड असल्याने घरातील मुले नेहमी आजारी पडतात.
* दरवाज्यासमोर नेहमी पाणी वाहते ठेवल्याने नेहमी आर्थिक नुकसान होत असते.
* दरवाज्यासमोर मंदिर असेल तर घरात कधीच सुख नांदत नाही.
* घराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर स्तंभ (खांब) असतील तर त्या घरातील महिला नेहमी आजारी पडतात.
* जमिनीच्या तुलनेत घराचा दरवाजा खोलगट भागात असेल तर घरातील मुख्य पुरुष व्यसनाधीन व नेहमी दु:खात बुडालेला असतो.
* घरासमोर रस्ता, मंदिर असेल तर घरासमोर अधिक जागा सोडल्याने दोष नाहीसे होतात.
* घराचे मुख्य प्रवेशद्वार घरातील इतर दरवाजापेक्षा मोठे असावे.