शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By

वास्तुनुसार लहान मुलांची खोली कशी असावी

'लहान मुलांची खोली', 'लहान मुलांची खोली घराच्या वायव्येच्या कोपर्‍यात तयार करावी. या खोलीचे दार उत्तर किंवा पूर्व दिशेकडे असावे. 
 
लहान मुलांच्या खोलीच्या भिंताचा रंग नारंगी असावा, कारण हा रंग शुभ समजण्यात येतो. मुलांच्या अभ्यासाचे टेबल भिंतीला चिटकऊन ठेऊ नाही. 
 
मुलांच्या खोलीत गणपती किंवा सरस्वतीचे चित्र लावावे. मुलांच्या खोलीत पलंग या प्रकारे ठेवावा ज्यायोगे मुलांचे डोके दक्षिणकडे असेल.शरीराचे चुंबकत्व कायम राखण्यासाठी याची मदत होते. 
 
गरज नसणार्‍या पुस्तकांची गर्दी मुलांच्या टेबलावर करू नका. टेबलावर ठेवलेल्या पुस्तकांची गर्दी आणि जाडपणा मुलांच्या मेंदूवर अनावश्यक दडपण उत्पन्न करू शकेल.
 
मुलांच्या खोलित पुस्तके नेहमी नैऋत्य, दक्षिण किंवा पश्चिम दिशांत ठेवायला हवी. आणि ईशान्य दिशेकडे ठेऊ नये. जर टेबल लँपचा वापर करायचा असेल तर त्यास डेस्कच्या आग्नेयकडच्या कोपर्‍यात ठेवावा.  
 
मुलांच्या खोलित पेंडुलम घड्याळ असणे हे शुभ लक्षणी समजले जाते. या मुळे मनाच्या एकाग्रतेत वाढ होते. मुलांसाठी ईशान्येस किंवा घराच्या पश्चिमेकडे खोली असावी. 
 
मुलींसाठी वायव्येस खोली असावी. मुलांच्या खोलित रॅक किंवा कपाट दक्षिण किंवा पश्चिम दिशेत असावे. 
 
मुलांच्या खोलीत दक्षिण किंवा पश्चिमेकडच्या भिंतीवर कधीही आरसा लाऊ नका. भिंतीवर ब्लैक बोर्ड असावा, ज्या योगे मुले भिंतीवर रंग रंगोटी करण्याशिवाय देखील आपली सर्जनात्मकतेची अभिव्यक्ती करू शकतील.