शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुलेख
Written By

घरातील वास्तुदोष बनतात आत्महत्येचे कारण, हे कारण असू शकतात

ज्या घरात आत्महत्या होतात त्या घरात दोन किंवा दोनापेक्षा जास्त वास्तुदोष अवश्य असतात. ज्यात एक आहे घरातील ईशान्य कोपरा (उत्तर पूर्व) आणि दुसरा दोष नैऋत्य कोण (दक्षिण पश्चिम) असतो. या दिशेत भूमिगत पाण्याची टाकी, विहीर, बोरवेल, बेसमेंट किंवा कुठल्याही प्रकारे या कोपर्‍यातील फरशी खाली असेल तर घरातील दक्षिण दिशेचा दक्षिणी कोपरा किंवा दक्षिण पश्चिमेचा दक्षिणी भाग वाढलेला असेल तर वास्तू प्रभावित होतो. 
 
जर घरातील पश्चिम नैऋत्य कोणात मुख्य दार असेल तर घरातील पुरूष सदस्य द्वारे आणि जर मुख्य दार दक्षिण नैऋत्य कोपर्‍यात असेल तर घरातील स्त्री द्वारे आत्महत्या करण्याची शक्यता असते.
 
वास्तुदोष घरातील ईशान्य कोपर्‍यात देखील असू शकतो. घरातील हा कोपरा आत दाबल्या गेला असेल, गोल झाला असेल किंवा कुठल्याही प्रकारे दक्षिण पूर्वेच्या भिंतीकडे पुढे वाढलेला असेल तर घरातील पुरुष सदस्य द्वारे आणि जर उत्तर पश्चिमी भिंतीचा उत्तरी भाग पुढे वाढलेला असेल तर स्त्री सदस्य आत्महत्या करू शकते.
 
घरातील दक्षिण नैऋत्यमध्ये मार्ग प्रहार असेल अर्थात या दिशेत एखादा रस्ता येऊन मिळत असेल तर स्त्रिया आणि पश्चिम नैऋत्यात एखादा मार्ग घराच्या दाराजवळ येऊन मिळत असेल तर पुरुष या प्रकारचे पाऊल उचलतात.
 
जमिनीच्या पूर्व आग्नेय कोणाला कुठल्याही वस्तूने झाकले नाही पाहिजे अन्यथा पुरुषांमध्ये निराशा आणि आत्महत्येची भावना येते जेव्हा की वायव्य झाकलेले असेल तर स्त्रिया निराश होऊन आत्महत्येचे पाऊल उचलतात. या प्रकारच्या घटनेपासून बचाव करण्यासाठी गरजेचे आहे की घर बनवताना वास्तूच्या या दोषांकडे लक्ष देऊन घर तयार करायला पाहिजे. जर भाड्याचे घर घेत असाल तर लक्षात ठेवावे की त्यात या प्रकारचे 
वास्तुदोष नसावे.