सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुलेख
Written By वेबदुनिया|

जमिनीचे वास्तुशोधन

शक्य आहे तोवर वास्तुशास्त्रातील नियमानुसार जमीन निवडावी. अशी जमीन मिळणे अवघड आहे पण अशक्य नाही. वास्तुशास्त्राच्या नियमानुसार ज्या जमिनीचा आकार, चढउतार त्याच्याशी निगडीत रस्ते नाहीत त्यावर घर बांधताना काळजी घ्यावी. शास्त्रात कोणत्याही प्रकारच्या जमिनीच्या आकारावर उपाय सांगितले आहेत. अशा जमिनीवर बांधण्यात येणार्‍या घराचा उद्देश तसेच मालकाची पत्रिका, नक्षत्र, योग, दशा या सर्वांचा मेळ साधला पाहिजे.

खाली जमिनीचा आकार कसा असावा याचे ढोबळ वर्णन दिले आहे. हे सर्व लोकांना, सर्व परिस्थितीत लागू होत नाही. त्यासाठी इतर तत्त्वांचाही विचार करायला हवा. पण तरीही ढोबळमानाने म्हणून ते लक्षात घ्या.

जमिनीच्या आकारानुसार वास्तुशोधन :-
जमीन कुठल्याही आकारात असू दे तिला आयताकार किंवा चौकोनी करून कोनाला 90 डिग्री अंशाचा प्रयत्न करावा. त्याची लांबी, रुंदी 1:1 किंवा 2:1 झाली तर चांगले होईल.

जमिनीच्या उतार चढावानुसार वास्तुशोधन :-
वास्तुशास्त्राचा सामान्य नियम आहे, की जमिनीचा चढाव किंवा उतार नैऋत्येकडून ईशान्येला, पश्चिमेकडून पूर्वेकडे किंवा दक्षिणेकडून उत्तरेकडे असणे चांगले. वास्तविक पाहता निसर्गात अशी जमीन मिळणे मुश्किल. या शिवाय जमिनीत चढ उतार, खड्डे असतात म्हणून त्याचे वास्तुशोधन आवश्यक आहे. यासाठी जमिनीचे परीक्षण करूनच निर्णय घ्यावयास हवा. वेगवेगळ्या परिस्थितीत वेगवेगळे शोध आणि नियमांचा विचार करावयास हवा.

1. नैऋत्य, पश्चिम व दक्षिणेच्या बाजूला माती घालून ईशान्य, पूर्व आणि उत्तरेला उतार केला जाऊ शकतो.
2. ईशान्य, पूर्व आणि उत्तरेला खोदून उतार केला जाऊ शकतो तसेच ईशान्य, पूर्व आणि उत्तर दिशेला खोदून नैऋत्य, दक्षिण तसेच पश्चिमेला उंच केले जाते.
3. नैऋत्य, पश्चिम आणि दक्षिणेच्या ज्या ठिकाणी खड्डा आहे किंवा जास्त उतार आहे त्याला भरता येते.
4. ज्या जमिनीवर घर बांधायचे त्याला लागून असणारा रस्ता उंच करून घेतला जातो. (जेव्हा घर बांधून होते.)
5. जर जमिनीवर घर बांधायचे नसेल तर त्याचे उतार शोधले पाहिजेत. कारण त्या उतारांचा मालकावर परिणाम होतो.
6. ब्रह्मस्थळावर खड्डा असेल किंवा तिथली जमीन जास्त खोल असेल तर लगेच भराव टाकावा. अन्यथा घर बांधताना मालकाला खूप अडचणी, मानसिक तसेच आर्थिक नुकसान होऊ शकते.
7. जमिनीच्या ब्रह्मस्थळ, ईशान्य कोन किंवा वास्तू पदविन्यासानुसार मर्मस्थळावर खड्डा किंवा उंचवटा असेल तर माती भरून किंवा कमी करून जमीन सारखी केली जाते.

विथीशूला किंवा वेदशुलाचे निराकरण :-
इंग्रजी T नुसार संपणार्‍या रस्त्याला विथीशूल किंवा वेदशुल म्हणतात. त्यातही शुभाशुभ आहेत. याचे निराकरणही जमीन मालकाची जन्म पत्रिका, जमिनीचे नियोजन, परिस्थितीनुसार वेगवेगळे असते. ज्यात जमिनीचे 2 किंवा 3 भाग करून किंवा भाग मोकळा सोडून झाडे लावून किंवा मुलांसाठी बाग बनवता येते.

विथीशूलाच्या संदर्भात महत्त्वाची गोष्ट अशी, की घराचा मुख्य भाग रस्त्याच्या अगदी समोर किंवा शेवट येऊ नये म्हणून घराची दिशा ठरवताना किंवा मुख्य दिशांशी ताळमेळ जोडताना विथीशूलेवर उपाय केला जाऊ शकतो.

मातीचे वास्तुशोधन (वास्तुशुद्धी) :-
अस्थी, कपाळ, अस्थिपंजर किंवा स्मशान किंवा मंदिराची जागा असल्यास वास्तुशोध करणे गरजेचे आहे. यासाठी शास्त्रात वेगवेगळे विधी सांगितले आहेत यात एक विधी हा आहे. जमिनीला 3 ते 5 फूट खोदून नवीन माती (जी मालकाच्या वर्णराशीनुसार अनुकूल आहे.) ती टाकावी पण हा उपाय खूप महाग असू शकतो. वरील विधी पूर्णरूपाने शक्य नसेल तर काही विशिष्ट ठिकाणी म्हणजे ईशान्य कोन, ब्रह्मस्थळ किंवा वास्तुपुरुषाच्या मर्मस्थळावर उपाय करणेही योग्य होईल.