1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. मुंबईतली काळरात्र
Written By वेबदुनिया|
Last Modified: मुंबई , सोमवार, 3 मे 2010 (16:21 IST)

दहशतवाद्यांचे मुंबईतील ऑपरेशन 'बालकोट'

दहशतवाद्यांचे
मुंबईवर हल्‍ला करण्‍यापूर्वी दहशतवाद्यांनी सलग तीन-चार महिने मुंबई शहराची आणि गेट वे ऑफ इंडियाच्‍या परिसरातील रस्‍त्यांची माहिती घेतली. त्‍यासाठी शहराचा व्‍हीडिओ देखिल काढल्‍याची माहिती समोर आली आहे. या कारवाईस दहशतवाद्यांनी 'ऑपरेशन बालकोट' असे नाव दिल्‍याची माहिती अजमल कसाब याने दिली आहे.

मुंबई हल्‍ल्‍यात अटक केलेल्‍या दहशतवाद्याकडून आता अनेक धक्‍कादायक माहिती समोर येत आहे. दहशतवाद्यांनी शहरावर हल्‍ला करण्‍यापूर्वी शहराचा व्‍हीडिओ काढल्‍याची कबुली अटक केलेल्‍या अजमल कसाब या अतिरेक्‍याने दिली आहे. मुख्‍यतः रेस्‍टारंट, हॉस्पिटल, आणि हॉटेल्‍स यांना टार्गेट करून अधिकाधिक लोकांना ओलीस ठेवण्‍याचा अतिरेक्‍यांचा डाव होता. त्‍यापूर्वी त्‍यांच्‍यापैकी एका गटाने शहराचा दोन वेळा व्‍हीडिओ काढला. तर दुस-या गटाने प्रत्‍यक्ष हल्‍ला केला.

दहशतवाद्यांनी मोबाईलसाठीचे सीमकार्ड कोलकाता आणि दिल्‍लीतून खरेदी केले. हल्‍ला केल्‍यानंतर अधिकाधिक लोकांना ठार करणे हा त्‍यांचा उद्देश होता. त्‍यांना दुस-या गटाकडून सोडवून नेण्‍याचीही योजना होती मात्र त्‍यांच्‍या प्रमुखांनी तसे न करता त्‍यांना मरण्‍यासाठी सोडून दिल्‍याचेही त्‍याने सांगितले.