शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: गुरूवार, 30 जून 2022 (11:42 IST)

मुंबईत प्रेमप्रकरणातून 3 महिलांची हत्या, नंतर आत्महत्या

मुंबईतील कांदिवली पश्चिम परिसरात एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. प्रेमप्रकरणातुन 3 महिलांची हत्या करत नंतर आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
 
येथे एका ड्रायव्हरने प्रेमप्रकरणातुन डॉक्टरची पत्नी आणि त्याच्या दोन मुलीची हत्या करत आत्महत्या केली. घटनास्थळी पाच सुसाईड नोटही सापडल्या आहेत. कांदिवली पोलिसानी सर्व मृतदेह शताब्दी रुग्णालयात पाठवले असून पुढील तपास सुरू केला आहे. 
 
किरण दळवी, मुस्कान दळवी, भूमी दळवी आणि शिवदयाल सेन अशी मृतांची नावे आहेत. भूमी दळवी नामक महिलेच्या प्रेमात पडल्याने तीन महिलांची हत्या करून गळफास घेतल्याचा उल्लेख ड्रायव्हर शिव दयाल याच्या खिशात सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये करण्यात आला आहे.