मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मंगळवार, 28 एप्रिल 2020 (23:06 IST)

5 दिवसांमध्ये एनएससीआयमध्ये 500 खाटांची कॉन्टेंक्टलेस फॅसिलिटी

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जी/दक्षिण विभागात आढळणार्‍या करोना पॉझिटिव्ह रुग्णांसाठी हाजी अली (वरळी) स्थित नॅशनल स्पोर्टस् कॉम्प्लेक्स ऑफ इंडिया येथे 500 खाटांची कॉन्टॅक्टलेस फॅसिलिटी अर्थात संपर्करहित सुविधा उभारण्याचे काम बृहन्मुंबई महानगरपालिकेने 5 दिवसांमध्ये पूर्ण केले आहे. राज्यायाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व  महानगरपालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यवाही युद्ध पातळीवर पूर्ण करण्यात आली आहे.
 
या ठिकाणी सौम्य ते तीव्र स्वरुपाचे लक्षण असलेल्या रुग्णांवर उपचारांची सुविधा पुरविण्यात येत आहे.