गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: सोमवार, 11 जुलै 2022 (17:29 IST)

खेळता- खेळता बिल्डिंगवरून कोसळुन 5 वर्षाच्या मुलाचा दुर्देवी मृत्यू

घरात लहान मुलं असल्यावर त्यांची विशेष काळजी घ्यावी लागते.अन्यथा काहीही अनुचित घडू शकते. मुंबईतील भायखळा परिसरात हायप्रोफाईल परिसरातील सोसायटी मध्ये एका इमारतीच्या 11 व्या मजल्यावरून खाली कोसळून एका 5 वर्षीय चिमुकल्याचा दुर्देवी अंत झाल्याची घटना घडली आहे.हा चिमुकला खिडकीजवळ खेळत असताना त्याच्या तोल जाऊन तो खाली कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला. 
 
मयत चिमुकला हा आपल्या आई-वडिलांसह भायखलाच्या पवित्र मार्गयेथील जनता सहकारी सोसायटीत राहत होता. घटना घडली तेव्हा मुलाची आई नातेवाईकांसह बोलत होती आणि हा चिमुकला बेडरूममध्ये खिडकी जवळ खेळत होता. खिडकीला ग्रील नाही त्यामुळे हा चिमुकला खिडकीतून वाकून पाहत असताना त्याचा तोल गेला आणि तो 11 व्या मजल्यावरून खाली उभारलेल्या स्कुटरवर पडून खाली पडला. या घटनेनंतर चिमुकल्याला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संपूर्ण इमारतीची पाहणी करून प्रकरणाची नोंद केली. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहे.