बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: बुधवार, 18 सप्टेंबर 2024 (18:58 IST)

मुंबईत फेसबुकवर लाईव्ह येऊन तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

suicide
मुंबईतील चेंबूर भागात राहणाऱ्या एका तरुणाने फेसबुकवर लाईव्ह येऊन गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. संदीप पासवान असे या मयत व्यक्तिचे नाव आहे. मयत संदीपने एका तरुणीवर आणि तिच्या कुटुंबियांवर शारीरिक व मानसिक त्रास देत मारहाण केल्याचा आरोप करत आत्महत्या केली.

मयत संदीप पासवान हा मुळात झारखंडचा रहिवासी होता. तो चार्टड अकाउंटंट होता.2018 मध्ये त्याच्या लग्नासाठी एका मुलीचा प्रस्ताव आला नंतर हळूहळू त्यांची जवळीक वाढली आणि ते एकमेकांना भेटू लागले. नंतर 2021 मध्ये त्या तरुणीने फ्लॅट खरेदीच्या नावावर संदीपकडून 1:25 लाख रुपये घेतले मात्र परत दिले नाही. संदीपला संशय आल्यावर त्याने तरुणींकडून पैसे परत मागितले. 

14 जून 2023 रोजी तरुणीच्या कुटुंबीयांनी संदीपला मुंबईला बोलावून पैसे घेऊन ये असे सांगितले. संदीप घरी आल्यावर त्यांनी त्याला मारहाण केली आणि नेहरू नगरच्या पोलिस ठाण्यात त्याच्यावर विनयभंग करण्याचा गुन्हा दाखल केला.  
संदीपने आपली बँकेची कागदपत्रे सादर करून तरुणीच्या आणि कुटुंबियांच्या विरोधात हजारीबाग  न्यायालयात विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तक्रार गांभीर्याने घेतली नसून सिव्हिल प्रकरण असल्याचे सांगत टाळले. असे संदीपने म्हटले. नंतर संदीपला प्रकरण माघारी घेण्यासाठी धमकी दिली.

17 सप्टेंबर रोजी सकाळी 7 वाजेच्या सुमारास संदीपने चेंबूरच्या घरात फेसबुक लाईव्ह करत अंगावरील मारहाणीच्या जखमा दाखवल्या आणि फाटलेले कपडे दाखवत मानसिक छळ करण्याचा आरोप तरुणी आणि तिच्या कुटुंबियांवर केला. शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून मी आत्महत्या करत आहे असे म्हटले. संदीपच्या मित्रांनी हा व्हिडीओ बघितल्यावर पोलिसांना माहिती दिली. मात्र पोलिसांच्या पोहोचण्यापूर्वीच संदीपने गळफास घेत आत्महत्या केली. 
Edited by - Priya Dixit