शुक्रवार, 8 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Updated : मंगळवार, 29 जून 2021 (19:53 IST)

अंबरनाथचा 'सिलिंडर मॅन' सोशल मीडियावर व्हायरल

Ambernath's 'Cylinder Man' goes viral on social media mumbai news in marathi webdunia marathi
अंबरनाथच्या या सिलेंडर मॅनचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.या सिलेंडर मॅनचे नाव सागर जाधव असून तो तो भारत गॅस मध्ये सिलेंडर डिलिव्हरी मॅनचे काम करतो.त्याने चक्क 2 -3 वर्ष मेहनत करून पिळदार शरीरयष्टी कमावली असून तो रातोरात स्टार झालाय.
 
आपल्याला जे काम करायचे आहे ते आहे ''30 किलोचे सिलेंडर उचलण्याचे,मग आपण 45 किलोचे असून कसे चालणार 'या जिद्दीमुळे त्याने आपली शरीरयष्टी कमाविली.त्यामुळे त्याचे कौतुक सर्वत्र अंबरनाथ मध्ये केले जात आहे. 
 
सागरचे काही फोटो क्लिक करून अंबरनाथच्या तुषार नावाच्या एका तरुणाने सोशल मीडियावर सहज अपलोड केले आणि ते फोटो प्रचंड व्हायरल झाले.त्यामुळे आता सागर रातोरात स्टार झाला आहे.सागरची विचारपूस काही कास्टिंग डायरेक्टर्स देखील करीत आहे.