मंगळवार, 30 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: बुधवार, 23 मार्च 2022 (13:21 IST)

मुंबईत महालक्ष्मी परिसरात इमारतीला आग

Building fire in Mahalakshmi area in Mumbai मुंबईत महालक्ष्मी परिसरात इमारतीला आग Maharashtra Mumbai News  In Webdunia Marathi
दक्षिण मुंबईतील महालक्ष्मी परिसरातील विठ्ठल निवास या इमारतीला भीषण आग लागल्याचे वृत्त मिळाले आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाचे दोन बंब दाखल झाले असून आग विझविण्याचे प्रयत्न सुरु आहे .आग इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर लागली होती. नंतर आग वेगाने पसरत गेली. आगीचे आणि धुराचे प्रचंड लोळ उठले आहे. इमारतीतील रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवित हानी झाल्याचे वृत्त नाही. अग्निशमनदलाचे आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरु आहे. परिसराच्या आजू बाजूस बघणाऱ्यांची गर्दी मोठ्याप्रमाणावर झाली आहे.