शुक्रवार, 3 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: सोमवार, 27 सप्टेंबर 2021 (15:46 IST)

डोंबिवली सामूहिक बलात्कार प्रकरण : पीडितेचा पैसे कमावण्याचे साधन म्हणून वापर

Dombivli gang rape case: Use of victim as a means of earning money Maharashtra News Mumbai News  Webdunia Marathi
येथील १५ वर्षीय सामूहिक बलात्कार प्रकरणात (रोज नवनवीन माहिती समोर येत आहे.आरोपींनी कंडोम ऐवजी प्लॅस्टिक पिशवीचा वापर केल्याचे समोर आले आहे.पीडितेचा पैसे कमावण्याचे साधन म्हणून मुख्य आरोपी वापर करत होता.त्याने पीडितेला व्हिडिओची धमकी देत मित्रांच्या स्वाधीन केले.महत्त्वाचे म्हणजे तिच्या अब्रूची किंमत ५०० रुपये लावल्याची माहितीही समोर आली आहे.
 
डोंबिवली पूर्वेकडील नांदीवली,देसलेपाडा ,वडवली,मुरबाड येथील फार्म हाऊस,कोळेगाव,बदलापूर सर्कल याठिकाणी गेली नऊ महिने पीडितेवर अत्याचार करण्यात आले.तिला कधी दारू,हुक्का तर कधी गुंगीचे औषध देऊन अत्याचार केले जात होते.दरम्यान मार्च महिन्यात एका ठिकाणी तिच्यावर तब्बल १५ जणांनी बलात्कार केला. यावेळी मुख्य आरोपीस दोघांनी प्रत्येकी ५०० रुपये दिल्याचे पीडितेने पोलिसांना सांगितले.सूत्रांच्या माहितीनुसार व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत मुख्य आरोपीकडून तिला बोलावले जायचे त्यावेळीही अशाच प्रकारे तिच्या अब्रूची किंमत लावली जायची.
 
आणखी दोन आरोपींना अटक
 
या घटनेत रविवारपर्यंत ३१ नराधमांना अटक करण्यात आली आहे.यामध्ये दोन आरोपी अल्पवयीन आहेत. त्यांची रवानगी भिवंडीतील बालसुधारगृहात करण्यात आली आहे. या अत्याचार प्रकरणात एकूण ३३ आरोपी आहेत.