शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: बुधवार, 10 मार्च 2021 (13:02 IST)

सचिन वाझे यांची तात्काळ बदली होणार, गृहमंत्र्यांची घोषणा

मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणावरुन विरोधकांच्या निशाण्यावर असलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची बदली होणार आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानपरिषदेत ही घोषणा केली आहे. सचिन वाझे यांची क्राइम ब्रांचमधून बदली करुन इतर ठिकाणी नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती दिली.
 
तसंच, 'एटीएएस तपास करत असून जे दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई केली जाणार. कुणालाही पाठीशी घालणार नसल्याचे देशमुख यांनी म्हटले. विरोधकांच्या मागणीनुसार सचिन वाझेंना क्राईम ब्रांचमधून हलवण्यात आले आहे. 
 
तरीही विरोधक मात्र सचिन वाझे यांना निलंबित करण्यात यावे आणि अटकेच्या मागणीवर ठाम असून सभागृहात जोरदार गोंधळ घातल असल्यामुळे कारवाई स्थगित करण्यात आली.