शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Updated : मंगळवार, 27 सप्टेंबर 2022 (20:57 IST)

मनसे विभाग प्रमुखाला बलात्काराच्या आरोपाखाली अटक

Vrishant Vadke
मुंबईतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मलबार हिल विधानसभेच्या विभाग प्रमुखाला बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी देण्याचे आमिष दाखवत महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप त्याच्यावर झाला आहे. या प्रकरणी एका 42 वर्षीय पीडित महिलेने पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मनसेचे मलबार हिल विधानसभेचे अध्यक्ष वृशांत वडके यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
 
वृशांत वडके यांच्याविरोधात आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत उमेदवारीचे तिकीट देण्याचे आश्वासन दिल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. त्यानंतर सप्टेंबर 2021 ते जुलै 2022 दरम्यान अनेक आमिष दाखवत शारिरीक संबध ठेवत फसवणूक केल्याचाही पीडितेने म्हटले आहे, ज्यानुसार आता पीडितेने मुंबईतील व्हीपी रोड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. तसेच आरोपी मनसे विभाग प्रमुख वृशांत वडके याला अटक केली आहे. संबंधित महिलेने काही दिवसांपूर्वी मनसे वरिष्ठांची भेट घेत घडलेला प्रकार सांगितला. यानंतर पक्षाने वृशांत वडके यांच्यावर कारवाई केली. ज्यानंतर चार दिवसांपूर्वी पक्षाने त्यांचा राजीनामा घेतला आहे.